औरंगाबाद, 5 ऑगस्ट : मुंबईत इकडे प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांनी पावसाळी अधिवेशन दणाणून सोडलेलं असतानाच मुख्यमंत्री मात्र हरिनाम सप्ताहात दंग झाल्याचं बघायला मिळालं. औरंगाबादमध्ये गगनगिरी महाराजांनी यांनी या हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं. अधिवेशनात रोजच्या गोंधळामुळे तणावात दिसणारे मुख्यमंत्री सप्ताहात शांत दिसत होते..त्यांनी रामगिरी महाराजांचा अशिर्वादही घेतला...अधिवेशनात विरोधकांवर राजकीय हल्ला करणारे मुख्यमंत्री सदगुरू आणि सप्ताहामुळं बंधूभाव वाढतो असं म्हणाले. या कार्यक्रमाला खास परवानगी घेतली असल्याचं ते म्हणाले.
सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे...आणि विरोधकांनी विविध विषयांवरून सत्ताधारी पक्षाला सळो की पळो करून सोडसंय. मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष दोघांचीही विरोधीपक्षाला आवरता आवरता दमछाक होत आहे..या सर्व गोंधळातून वेळ काढून या दोघांनीही औरंगाबादमध्ये गंगागिरी महाराज यांच्या सप्ताहाला हजेरी लावली. हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून लावलेली हजेरी राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावून गेलीय.