मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत 'दादां'ना प्रतिक्षा खुर्चीची!

मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत 'दादां'ना प्रतिक्षा खुर्चीची!

मुख्यमंत्र्यांच्या उजव्या बाजूला बसण्यात सुभाष देसाईंची गफलत घडली आणि पत्रकार परिषदेत दादांना खुर्चीची वाट पाहावी लागली.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 24 फेब्रुवारी : सोमवारपासून सुरु होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पूर्व संध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या सह्याद्री अतिथीगृहात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांच्या डाव्या बाजूला सेनेचे मंत्री दिवाकर रावते बसले होते. पण उजव्या बाजूला भाजपाचा मंत्री असणं अपेक्षित होतं.

मात्र नेमके सुभाष देसाई यांच्या ते लक्षात आलं नसावं किंवा मुख्यमंत्रांच्या डाव्या बाजूला शेजारी आपल्याच पक्षाचे रावते बसले आहेत हे सुद्धा लक्षात आलं नसावं. देसाई मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या उजव्या हाताशी असलेल्या खुर्चीत बसले.

चंद्रकांत पाटील यांच्या मात्र सीएमच्या बाजूची जागा सुभाष देसाई यांनी पटकावली असल्याचं लक्षात आलं. सुभाष देसाई खुर्चीत बसले असताना चंद्रकांत पाटील यांनी देसाई यांनी बाजूला बसण्याची, खुर्ची बदलण्याची 'विनंती' केली.

क्षणाचाही विलंब न लावता देसाई यांनी जागा बदलली आणि सीएमच्या बाजूला बसण्याचा मान चंद्रकांत पाटील यांना दिला.

पाटील यांनी सीएमच्या बाजूची जागा पटकावली. असं असलं तरीही युतीच्या फॉर्म्युल्याबाबत आपण सांगू तेच खरं असं सांगत कोण बॉस आहे हे मुख्यमंत्र्यांनी ठासून सांगितलं.

First published: February 24, 2019, 9:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading