औरंगाबादमध्ये रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2017 09:02 PM IST

औरंगाबादमध्ये रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

17 एप्रिल : राज्याचे मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबादेत मारहाण करण्यात आली आहे. औरंगाबादमधील सुभेदारी गेस्ट हाऊसमध्ये दुपारच्या दरम्यान मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. मुंबईतील आंबेडकर भवन पाडकामाच्या रागातून रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे. मारहाणीत गायकवाडांच्या छातीला दुखापत झाल्याचंही समजतं आहे.

मुंबईतील दादर स्टेशनच्या बाजुला असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन पाडल्याच्या निषेर्धात घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केली. रत्नाकर गायकवाड यांच्याबरोबरच त्यांच्या पत्नीलाही भारिप कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर येत आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 17, 2017 09:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...