15 जून : भाजप मध्यावधी निवडणुकांसाठी तयार आहे, असं सूचक विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
जर कोणाला सत्तेतील पाठिंबा काढून मध्यावधी निवडणुका घ्यायच्या असतील तर घ्याव्यात. निवडणुकांनंतर आम्हीच सत्ता स्थापन करु, असा माझा विश्वास आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही पक्षाचं नाव न घेता इशारा दिला.
राज्यातील महापालिका, नगरपरिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीतील कामगिरी पाहता जनता भाजपलाचा कौल देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांना आहे.
'हे यश अभूतपूर्व आहे. कोणत्याही पक्षाला असं यश मिळालं नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीलाही त्यांच्या कार्यकाळात हे यश मिळवता आलं नाही. यावरुन जनतेचा सरकारवर विश्वास असल्याचं दिसतं,' असंही मुख्यमंत्री म्हणालेत.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा