सुकमाचा बदला! स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

सुकमाचा बदला!  स्पेशल कमांडोंच्या कारवाईत 20 नक्षलवादी ठार

  • Share this:

17 मे : सुरक्षा दलाला नक्षलविरोधी मोहिमेत मोठं यश मिळालं आहे. बिजापूर इथे नक्षलवादी विरोधी अभियानात सुरक्षा दलाच्या जवानांनी 20 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.

सुकमा हल्ल्यात सीआरपीएफचे 25 जवान शहीद झाल्यानंतर सुरक्षा दलाकडून नक्षलवाद्यांना धडा शिकवण्यासाठी मोठ्या मोहिमेची आणखी केली होती. या ऑपरेशनला यश आलं असून सुरक्षा दलानेच यासंबंधीच्या कारवाईचा व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात कोब्रा बटालियननं 13  ते 14 मे रोजीच्या रात्री सुकमा आणि बिजापूरच्या जंगलात ही धडाकेबाज कारवाई केलीय. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 20 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे.

First published: May 17, 2017, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading