शिवसेनेनं फक्त अग्रलेख लिहणं थांबवून सत्तेतून बाहेर पडावं : ओवेसी

शिवसेना राज्य आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहे. याचाच धागा पकडत असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 20, 2018 04:17 PM IST

शिवसेनेनं फक्त अग्रलेख लिहणं थांबवून सत्तेतून बाहेर पडावं : ओवेसी

मुंबई, 20 ऑक्टोबर : शिवसेनेने फक्त अग्रलेख लिहणं थांबवून आता मोदी आणि फडणवीसांच्या सत्तेतून बाहेर पडायला हवं, असं म्हणत MIMचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. सत्तेतील भूमिकेवरून ओवेसी यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला.

‘शिवसेना ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरते. हा भ्याडपणा लपवण्यासाठी ते सत्तेविरोधी अग्रलेख लिहण्याचं नाटक करतात. माझी शिवसेनेला विनंती आहे की त्यांनी मोदी आणि फडणवीसांच्या सत्तेतून बाहेर पडायला हवं,’ असं ओवेसी म्हणाले.

नुकत्याच झालेल्या दसऱ्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आणि इतर मुद्द्यांवरुन भाजप आणि पंतप्रधान मोदींवर चौफेर टीका केली. असं असलं तरीही दुसरीकडे, शिवसेना राज्य आणि केंद्रात भाजपसोबत सत्तेत आहे. याचाच धागा पकडत असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

दरम्यान, काल महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन सेनेवर कडाडून टीका केली. ‘शिवसेनेने राम मंदिर बांधण्याआधी मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक बांधावं,’ असं नारायण राणे म्हणाले होते.

दसरा मेळाव्यात काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

Loading...

  • चांगलं काम करण्यासाठी छाती नाही, हिंमत पाहिजे. मनगटात जोर पाहिजे.
  • सरकार भाववाढ रोखण्यास अपयशी. विष्णुचा अकरावा अवतार तुमच्यासोबत असतानासुद्धा तुम्हाला महागाई रोखता येत नाही. हे कसलं सरकार ?
  • एकदाचं सांगा मंदिर केव्हा बांधायचंय ते. तुम्ही सांगा नाही तर आम्ही बांधतो. त्याचीच आठवण करून द्यायला मी अयोध्येत जातोय. २५ नोव्हेंबरला अयोध्येत जाणार.
  • सरकारमध्ये धमक नाही. केंद्रात आणि राज्यात तुमचं सरकार असताना दुष्काळ का जाहीर करत नाही. लवकरच दुष्काळ जाहीर झाला नाही तर शिवसेना सरकारविरुद्ध आंदोलन करणार.

 

भाजप नगरसेवकाने पोलिसाला जबरदस्त धुतलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 20, 2018 03:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...