अमृता फडणवीस फेमिनाच्या कव्हरवर; मुख्यमंत्र्यांची पत्नी पुन्हा चर्चेत

अमृता फडणवीस फेमिनाच्या कव्हरवर; मुख्यमंत्र्यांची पत्नी पुन्हा चर्चेत

याआधी नदी संवर्धनासाठी अमृता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या एका व्हीडिओने तर महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. अनुष्का शर्मा, ऐश्वर्यासारख्या अभिनेत्री आणि ब्युटी क्वीन्स यांना कव्हरपेजवर जागा देणाऱ्या फेमिनानं या वेळच्या अंकासाठी अमृता फडणवीस यांचं खास फोटो सेशन केलं आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : आपल्या गायनासाठी याआधी चर्चेत आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आता वेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत आल्या आहेत. फेमिना या प्रसिद्ध नियतकालिकाच्या कव्हरवर अमृता फडणवीस झळकल्या आहेत. याआधी फेमिनाच्या कव्हरपेजवर ऐश्वर्या रॉय, अनुष्का शर्मासारख्या प्रसिद्ध अभिनेत्री दिसल्या होत्या.

फेमिनाच्या या कव्हरवरील फोटोत अमृता फडणवीस यांनी काळ्या रंगाचा गाऊन घातलेला पाहायला मिळतोय. फेमिनाच्या या अंकात अमृता यांची मुलाखतही छापून आली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली आहेत.

अमृता फडणवीस यांनी स्वतःच याबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. त्या म्हणतात, ‘आपण सर्वच फार ग्रेट काही करू शकतो असं नाही, पण आपण छोट्याच गोष्टी फार प्रेमाने करू शकतो.’

दरम्यान, याआधी अमृता फडणवीस यांनी बिग-बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत गाणं चित्रित केलं होतं. तसंच नदी संवर्धनासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केलेल्या एका व्हीडिओने तर महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता. त्या व्हीडिओवर दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

VIDEO पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यातील १० ठळक मुद्दे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2018 04:13 PM IST

ताज्या बातम्या