पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दोन तरुणांच्या मृत्यूने खळबळ

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दोन तरुणांच्या मृत्यूने खळबळ

ढेकूण घालवण्यासाठी करण्यात आलेलं पेस्ट कंट्रोल दोघांच्या जीवावर बेतलं

  • Share this:

पुणे, 7 मार्च : पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे आणखी दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. घरात झालेले ढेकूण घालवण्यासाठी करण्यात आलेलं पेस्ट कंट्रोल दोघांच्या जीवावर बेतले. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, पुण्यातील एका महाविद्यालयाच्या कॅन्टीनमध्ये दोन्ही तरू काम करत होती. यातील अजय बेलदार हा जळगावचा तर अनंता खेडकर बुलढाण्याचा रहिवाशी आहे. हॉटेल मालकाकडून त्यांना राहण्यासाठी एक खोली देण्यात आली होती. या खोलीत ढेकूण झाल्याने तीन दिवसांपूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यात आले. त्यानंतर तीन दिवस ते मित्राच्या घरी जाऊन राहिले होते.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पेस्ट कंट्रोल केल्यानंतर तीन दिवसांनी मंगळवारी दोघेही खोलीवर परतले. त्यानंतर बुधवारी ते कामावर वेळेत आले नाहीत म्हणून कॅन्टीन मॅनेजर त्यांना बोलावण्यासाठी खोलीवर आला. तेव्हा बराच वेळ दरवाजा ठोठावल्यावरही दार न उघडल्याने त्याने खिडकीतून आत पाहिले. तेव्हा दोघेही झोपले असल्याचे दिसले. त्यानंतर कॅन्टीन मॅनेजरने दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यानेच दोघांनाही रुग्णालयात दाखल केलं पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससूनमध्ये पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास करत पोलिस करत आहेत.

VIDEO: गोंधळ घालणाऱ्या विदर्भवाद्यांना गडकरींनी दिला सज्जड दम, म्हणाले...

First published: March 7, 2019, 11:29 AM IST
Tags: pune

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading