S M L

अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

अहमदनगर इथल्या पाथर्डी तालुक्यातील वडगावमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली.

Samruddha Bhambure | Updated On: Apr 2, 2017 06:10 PM IST

अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये 5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

02 एप्रिल : अहमदनगर इथल्या पाथर्डी तालुक्यातील वडगावमध्ये एका पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपी भगवान वाघमारेला पोलिसांनी अटक केली आहे. काल शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.

पाथर्डीतील वडगावमध्ये शनिवारी संध्याकाळी ही चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. पीडित मुलीचे आई-वडील गावी गेले होते. ही संधी साधून 63 वर्षीय भगवान वाघमारे यानं मुलीला घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. झालेला प्रकार पीडित मुलीनं आपल्या आईवडिलांना सांगितल्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली.

आरोपी भगवान वाघमारे विरोधात 376 आणि 452 कलमाअंतर्गत पोक्सा कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

कोपर्डीतील तरुणीवर अत्याचारांनंतर राज्यभर आंदोलन करण्यात आलं होतं. मात्र पाथर्डीमध्ये पुन्हा 5 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानं नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 2, 2017 06:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close