कन्हैया खंडेलवाल, प्रतिनिधी
हिंगोली, 12 मे : सध्या संपूर्ण जग हे कोरोनाशी लढा देत आहे. भारत आणि विशेष करून महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले आहे. अशा परिस्थितीत शासन आणि प्रशासन कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून आटोकाट प्रयत्न करत आहेत. कोरोनाविरोधात या युद्धात अधिकारी, कर्मचारी, राज्याचे मंत्री सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड हिंगोली जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आल्या होत्या. धावपळीचा हिंगोली जिल्ह्याचा आढावा दौरा आटोपून त्या परत मुंबईकडे जात असताना वर्षा गायकवाड आणि त्यांचे पती राजू गोडसे यांनी शेतात विसावा घेतला.
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड काल हिंगोलीच्या पालकमंत्री या नात्याने सर्व आढावा हिंगोलीवरुन पुन्हा मुंबईला जात असतांना त्यांच्यासोबत सावलीप्रमाणे साथ देणाऱ्या पती राजूभाऊ गोडसे यांच्यासोबत एका शेतात बसून जेवण करताना.
आपली सर्व लोक अशीच साधी आहेत...😊@VarshaEGaikwad pic.twitter.com/dqCPtkB0Je — महाविकास आघाडी (@MHVaghadi) May 10, 2020
मुंबईकडे जात असताना वर्षा गायकवाड यांनी वाटेत आपला ताफा थांबवला. रस्त्याच्या कडेला एका शेताकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. शेतात लिंबाच्या झाडाखाली त्यांनी जेवणाचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांचे पती राजू गोडसे आणि वर्षा गायकवाड यांनी निवांत जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी त्यांच्या सुरक्षारक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांनीही शेतात निवांत जेवण घेतलं आणि पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.
संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.