Home /News /news /

कोकणातील भात, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

कोकणातील भात, आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारचा नवा प्लॅन

कोकणातील शेतकऱ्यांना (Konkan farmers) गरजेनुसार गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते मिळेल याची खबरदारी घ्या असे स्पष्ट आदेश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (dada bhuse) यांनी कोकण विभाग खरीप हंगाम बैठकीत दिले.

  रत्नागिरी 14 मे : कोकणातील शेतकऱ्यांना (Konkan farmers) गरजेनुसार गुणवत्तापूर्ण बियाणे आणि खते मिळेल याची खबरदारी घ्या असे स्पष्ट आदेश राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी कोकण विभाग खरीप हंगाम बैठकीत दिले. राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे विभागस्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन बैठक 2022 संपन्न झाली. या बैठकीत कृषी मंत्री दादाजी भुसे (minister dada bhuse) यांनी ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या पाच जिल्ह्यांचा आढावा घेतला.

  कोकण विभागाचा एकूण 4.43 लाख हेक्टर खरीप क्षेत्र असून ठाणे जिल्हा 0.50 लाख हेक्टर, पालघर जिल्हा 1.03 लाख हेक्टर, रायगड जिल्हा 1.18 लाख हेक्टर, रत्नागिरी जिल्हा 0.92 लाख हेक्टर तर सिंधुदूर्ग जिल्हयाचे 0.69 लाख हेक्टर खरीप क्षेत्र आहे. कोकण विभागाची सन 2022-23 साठी एकूण 89310 क्विंटल बियाणे मागणी प्रस्तावित असून ठाणे जिल्हयाची 17500 क्विंटल, पालघर जिल्हा 26700 क्विंटल, रायगड 22750 क्विंटल, रत्नागिरी जिल्हा 14735 क्विंटल तर सिंधुदूर्ग जिल्हयाची 7625 क्विंटल मागणी प्रस्तावित आहे.

  हे ही वाचा : आजच्या सभेत उद्धव ठाकरे जनतेच्या मनातील या प्रश्नांची उत्तरे देणार का? नितेश राणेंचा सवाल

  सन 2022-23 साठी कोकण विभागाचे खरीप पिक कर्ज एकूण 1159.83 कोटीचे आहे. ठाणे जिल्हा 139.78 कोटी, पालघर जिल्हा 157.40 कोटी, रायगड जिल्हा 278.05 कोटी, रत्नागिरी जिल्हा 284.60 कोटी, सिंधुदूर्ग जिल्हा 300 कोटीचे खरीप पिक कर्ज उद्दीष्ठ आहे.

  कृषी मंत्री भुसे यांनी सन 2022-23 मध्ये राबविण्यात येणाऱ्या भात बियाण्याची उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रिया मोहिम, लागवड पध्दतीचा प्रसार, बांधावर तुर लागवड, शेतीशाळा, 10 टक्के रासायनिक खतांची बचत, यांत्रिकी पध्दतीने भात लागवड व ड्रोन द्वारे फवारणी, जुन्या आंबा बागांचे पुर्नजीवन, आंब्याची उत्पादकता वाढविणे, आंबा मोहोर संरक्षण प्रशिक्षण, काजु - जुन्या बागांचे व्यवस्थापन, काजुची उत्पादकता वाढविणे, हॉर्टिनेट, मॅगोनेट, व्हेजनेट शेतकरी नोंदणी वाढ करणे, फळबाग लागवड- मग्रारोहयो क्षेत्र विस्तार आदि विषयांवर चर्चा केली, आढावा घेतला व त्याअनुषंगीक सूचना केल्या.

  कोकणात सर्वात जास्त पाणी टंचाई

  टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या गावे, वाड्या आणि टँकर्सची संख्या महसूल विभागनिहाय पुढीलप्रमाणे:  अमरावती - गावे 41, वाड्या - निरंक, टँकर्स - 41 . औरंगाबाद - गावे 14, वाड्या - 1, टँकर्स - 24. कोकण - गावे 111, वाड्या - 366, टँकर्स - 78. नाशिक - गावे 73, वाड्या - 86, टँकर्स - 72. पुणे - गावे 42, वाड्या - 285, टँकर्स - 55. नागपूर विभागात कोणतेही गाव, किंवा वाडी-वस्ती यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत नाही.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Agriculture, Farmer, Konkan

  पुढील बातम्या