मुंबई, 15 मार्च : राज्यात संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्याचा राज्य सरकार विचार करतेय. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी ही टप्प्या टप्प्याने लागू केली जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात सर्व प्रकारच्या प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सहा महिन्यांच्या कालावधीनंतर पिण्याच्या प्लास्टिकच्या बाटलीवर बंदी घातली जाणार आहे. या प्लास्टिकच्या बाटलीला पर्याय म्हणून पुर्नवापर करता येणाऱ्या बाटल्या किंवा नाशवंत बाटल्या असा पर्याय ठेवला जाणार आहे.
अर्थात असा मोठा निर्णय घेण्याचा राज्य सरकार विचार करत असला तरी नेहमीच्या वापारातील प्लास्टिकला पर्याय देण्याचं कामही राज्य सरकारला करावा लगाणार आहे. दुधाच्या पिशव्यांना काय पर्याय असू शकतो यावरही प्रशासन विचार करतंय. प्लास्टिकला पर्याय दिला नाही तर हा निर्णय वादाता अडकू शकतो अशी भीती असल्यानं त्याची जोरदार पूर्वतयारी सुरू आहे.
तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.