राज्यात आज तीन महत्त्वाच्या 'डेडलाईन्स' संपणार !

राज्यात आज तीन महत्त्वाच्या 'डेडलाईन्स' संपणार !

पीक विमा, मुंबई विद्यापीठाचे निकाल आणि आयटी रिटर्न यांची आज डेडलाईन संपणार आहे...आजही बिगर कर्जदार शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन पीकविम्यासाठी अर्ज भरता येईल.

  • Share this:

मुंबई, 5ऑगस्ट : पीक विमा, मुंबई विद्यापीठाचे निकाल आणि आयटी रिटर्न यांची आज डेडलाईन संपणार आहे...आजही बिगर कर्जदार शेतकरी आपला पीकविमा अर्ज भरु शकतील. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतकऱ्यांना ऑनलाईन पीकविम्यासाठी अर्ज भरता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. काल पीकविमा भरण्याची शेवटची मुदत होती, मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता.आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दाखल झालेल्या अर्जांची दोन आठवड्यांमध्ये छाननी केली जाईल. अर्जांची छाननी झाल्यानंतरच पीकविम्याचा हफ्ता शेतकऱ्याला भरावा लागणार आहे. अर्जांची छाननी आणि पीकविम्याच्या भरण्यानंतर शेतकरी पीकविम्यासाठी पात्र असेल.

तर दुसरीकडे मुंबई विद्यापीठाचे निकालाचा घोळ कायम आहे. राज्यपालांनी दुसऱ्यांदा 5 ऑगस्टपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश मुंबई विद्यापीठाला दिले होते. त्यामुळे मुंबई विद्यापीठाची आज डेडलाइन संपणार आहे. पण कुलगुरू यांनी 5 ऑगस्टपर्यंत निकाल लावणं शक्य नसल्याने 15 ऑगस्टपर्यंत निकाल लावू असं सांगितलं होतं. त्यामुळे नेमका हे निकाल लागणार कधी हे सांगणं कठिणच आहे.

तिसरी महत्त्वाची बातमी आहे, इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी दिलेली मुदतवाढ आज संपते आहे. करदात्यांच्या सोयीसाठी आज मध्यरात्रीपर्यंत आयकर विभागाची कार्यालये सुरु राहणार आहेत...आयटी रिटर्न फाईल करण्याची 31 जुलै ही शेवटची मुदत असते. पण करदात्यांचा वाढता ओघ लक्षात घेता, प्रशासनाने ही मुदत 5 ऑगस्टपर्यंत वाढवली होती. ती मुदतवाढ आज संपणार आहे.

First published: August 5, 2017, 11:12 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading