खळबळजनक, SBIने सर्व्हरला पासवर्डच ठेवला नाही, खातेधारकांची माहिती लीक झाल्याची भीती

खळबळजनक, SBIने सर्व्हरला पासवर्डच ठेवला नाही, खातेधारकांची माहिती लीक झाल्याची भीती

बँक बॅलेन्स, खाती क्रमांक यांच्यासहित काही महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे.

  • Share this:

मुंबई, 31 जानेवारी : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या खातेधारकांसाठी ही एक महत्वाची बातमी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडियामधील खात्यांची महत्त्वाची माहिती लीक झाल्याची शक्यता आहे.

बुधवारी एसबीआयने ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही पासवर्ड न ठेवल्याने मुंबईतील हजारो खातेधारकांची माहिती लीक झाल्याची भीती व्यक्त केली जातं आहे.

बँक बॅलेन्स, खाती क्रमांक यांच्यासहित काही महत्त्वाची माहिती लीक झाल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) तुमचं खात असेल तर तुमची महत्त्वाची माहिती लीक झाल्याची भीती आहे.

एसबीआयने ग्राहकांची महत्त्वाची माहिती असणाऱ्या सर्व्हरला कोणत्याही सुरक्षेविना ठेवलं होतं. त्यामुळे मुंबईत असणाऱ्या या सर्व्हरमध्ये हजारो ग्राहकांची महत्त्वाची माहिती होती जी लीक होऊ शकते.

मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हरला कोणताही पासवर्ड ठेवण्यात आला नसल्यामुळे कोणीही बँकेचा महत्त्वाचा डेटा हाताळू शकतं. त्यात एसबीआय ही एक मोठी बँक आहे. लाखो ग्राहकांचं या बँकेत खातं आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे.

दरम्यान, ग्राहकांनी आपले अकाऊंट एकदा तपासून घ्या. कारण हा सर्व्हर एसबीआय क्विक या सेवेचा भाग आहे. ऐवढ्या महत्त्वाच्या सर्व्हरला पासवर्ड कसा ठेवण्यात आला नाही असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

VIDEO : जेव्हा अजितदादा 12 कोटींच्या रेड्याचा किस्सा सांगता

First published: January 31, 2019, 10:58 AM IST

ताज्या बातम्या