ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा

बँकेतील ग्राहकांना नवीन योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँक सतत प्रयत्न करत असते. हेच लक्षात घेऊन एसबीआय बँकेनं नेट बँकिंग सेवेमध्ये एका नव्या फिचरचा समावेश केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 16, 2018 02:07 PM IST

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी बदलले नियम, SBI नं केली घोषणा

मुंबई, 16 नोव्हेंबर : स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नेहमीच तत्पर असते. ग्राहकांना नवीन योजनांचा लाभ घेता यावा यासाठी बँक सतत प्रयत्न करत असते. हेच लक्षात घेऊन एसबीआय बँकेनं नेट बँकिंग सेवेमध्ये लाभदायी फिचरचा समावेश करण्यात आला आहे. या फिचरमुळे एसबीआय बँकेकडून आनलाईन पैसे ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे.


दिवसा पैसे ट्रान्सफर करताना विशिष्ट रकमेपेक्षा जास्त रक्कम पाठवता येत नव्हती. परंतु आता या रकमेच्या मर्यादेत वाढ करण्यात आली आहे.  तुम्ही पैसे पाठवत असलेलं खातं एसबीआय बँकेचं असेल तर काही मिनिटात तुम्हाला पैसे ट्रान्सफर करता येतील पण जर इतर कणत्याही बँकेचं खातं असल्यास तुम्ही IMPS आणि NEFT चा वापर करून पैसे ट्रान्सफर करू शकता.

एसबीआय बँकेतून आता 25 हजारपर्यंत रक्कम ट्रान्सफर करता येणार आहे. त्याचबरोबर पैसे ट्रान्सफर करताना 10-10आणि 5  हजारांच्या टप्प्यांमध्ये ट्रान्सफर करावे लागेल. अशी माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ट्विटरवरून देण्यात आली आहे.


Loading...

 
प्रत्येक बँकेमध्ये पैसे ट्रानफर करताना बेनिफिशिअरी हा पर्याय निवडून पैसे ट्रन्सफर करावे लागतात. यामध्ये काही बँका अर्धा तासाहून जास्त वेळ घेतात, तर काही बँकामध्ये हे काम लवकर होतं.  एसबीआय बँक मात्र या पर्यायाशिवाय पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा देणार आहे. यासाठी बँकेकडून 'क्विक ट्रान्सफर' असा पर्याय नेट बँकिंगमध्ये देण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 16, 2018 02:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...