Home /News /news /

अरे रे! नीतावर आली अबोलीचे पाय चेपण्याची वेळ, अभिनेत्रीनं शेअर केला VIDEO

अरे रे! नीतावर आली अबोलीचे पाय चेपण्याची वेळ, अभिनेत्रीनं शेअर केला VIDEO

अबोली मालिकेचे कलाकार गौरी कुलकर्णी आणि शर्मिष्ठा राऊत सेटवर ब्रेकदरम्यान धमाल करताना दिसतायत. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे.

  मुंबई, 02 जून:  स्टार प्रवाहवरील ( Star Pravah) अबोली ( Amoli) या मालिकेत सध्या क्रिकेट मॅच ट्रॅक सुरू आहे. यातही नीता आणि तिचा नवरा अबोली आणि अंकुशला हरवण्यासाठी पुरेपूर प्लान आखत आहेत. अबोलीचं नेहमीच वाईट चिंतणाऱ्या नीतानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊत ( Sharmishtha Raut) हिनं नीताची ( Neeta) भूमिका उत्तमरित्या निभावली आहे. मालिकेच्या मागील काही भागांमध्ये अबोलीनं नीताला चांगलेच खडे बोल सुनावले होते. त्यानंतर नीता अबोलीपासून जरा लांबचं असल्याचं पाहायला मिळालं. मात्र आता अबोलीनं थेट नीताला तिचे पाय चेपायला लावलं आहे. नीता अबोलीचे पाय चेपत असल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. स्टार प्रवाह वरील अबोली मालिकेच्या सेटवर कलाकारांची मस्ती चाललीये. अबोली मालिकेचे  कलाकार गौरी कुलकर्णी आणि शर्मिष्ठा राऊत सेटवर ब्रेकदरम्यान धमाल करताना दिसतायत. अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शर्मिष्ठा हि गौरीचे पाय दाबताना दिसत आहे. रडत रडत शर्मिष्ठा गौरीचे पाय दाबत आहे आणि गौरी तिला तळपाय दाब अशा सूचना करताना दिसतेय.
  हेही वाचा - PHOTO:'सुंदर मना...' मधील कामिनी आता सहकुटुंब सहपरिवारात आणणार विघ्न? 'सेटवरची मस्ती' असा काप्शन  देत शर्मिष्ठाने हा व्हिडीओ शेअर केला आहे. शर्मिष्ठा बऱ्याचदा सहकलाकारांसोबत मस्ती करताना दिसून येते. मालिकेच्या सेटवर या कलाकारांमध्ये खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळतं. मालिकेचे कलाकार असेच गमतीशीर व्हिडीओ करून ते सोशल मीडियावरती पोस्ट करत असतात. चाहतेही ह्या वेगवेगळे  व्हिडीओज बघणं पसंत करतात. अबोली या मालिकेत शर्मिष्ठा राऊतसह सचित पाटील, गौरी कुलकर्णी, प्रतीक्षा लोणकर, अंगद म्हसकर  या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. अबोली मालिकेत सध्या क्रिकेटची मॅच रंगणार आहे, त्याचंच शूटिंग सध्या सुरु आहे. ही मॅच क्रिश आणि अंकुश यांच्या दोन टीममध्ये खेळली जाणार आहे. अबोली आणि अंकुश  राहत असलेल्या चाळीची मालकीण इरावती हिने अबोलीला क्रिकेट मॅच जिंकण्याचं चॅलेंज दिलं आहे.  नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की कृषकडे पूर्ण प्रोफेशिअनल टीम आहे. तर अंकुश आणि गौरी चाळीतल्या लोकांना घेऊन क्रिकेट मॅच खेळणार आहेत. आता हि क्रिकेट मॅच कोण जिंकतंय ते बघणं महत्वाचं ठरणार आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या