नवी दिल्ली, 06 सप्टेंबर : यूकेच्या बर्मिंघम सिटीमध्ये (Birmingham City) रविवारी चाकूने हल्ला करण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बर्मिंघम सिटी सेंटरसह इतरही अनेक ठिकाणी चाकू हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. या चाकू हल्लाच्या घटनांमध्ये मोठ्या संख्येने लोक जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Alert! या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान
बर्मिंघम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीटी सेंटरमध्ये चाकूने वार केल्याची पहिली घटना शनिवारी रात्री साडेअकरा वाजता घडली. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. आधी बर्मिंघम शहरात हल्ला झाल्याची घटना घडली असं पोलिसांचं म्हणणे आहं. त्यानंतर परिसरातील अनेक भागातून अशा प्रकारच्या आणखी काही घटना समोर आल्या. या हल्ल्यांमध्ये नेमके किती लोक जखमी झाले आहेत याची माहिती अद्याप समोर आली नसली तर जखमींची संख्या जास्त असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
19 वर्षीय कोरोना संक्रमित तरुणीवर रुग्णवाहिकेत बलात्कार, नंतर नेलं कोविड सेंटरला
वेस्ट लँड पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही एक मोठी घटना आहे. चाकू हल्ल्याच्याच समान घटना अनेक शहरांत एका वेळी समोर येणं ही चिंतेची आणि मोठी बाब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या हल्ल्यांमध्ये जखमी झालेल्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या हल्ल्यामुळे नागरिक घाबरले असून तातडीने आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.