Home /News /news /

एसटीने जाण्यासाठी फक्त फोनवरच होणार बुकिंग, असा असेल प्रवास

एसटीने जाण्यासाठी फक्त फोनवरच होणार बुकिंग, असा असेल प्रवास

नोकरी शिक्षण यामुळे शहरात अडकलेल्या लोकांना गावी जाता यावं यासाठी एसटीनं तिकीट बुकिंग सुरू केलं आहे.

मुंबई, 07 मे : राज्यात कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात आला आहे. यावेळी तिसऱ्या टप्प्यामध्ये काही नियम शिथिल करत काही विशेष गाड्यांनी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. अशात नोकरी शिक्षण यामुळे शहरात अडकलेल्या लोकांना गावी जाता यावं यासाठी एसटीनं तिकीट बुकिंग सुरू केलं आहे. एसटीनं आपल्या गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी काही हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत. याद्वारे ऑनलाईन बुकिंग करून इच्छुक नागरिकांना त्यांच्या गावी जाता येणार आहे. पुढच्या 24 तासांमध्ये हे नंबर सुरू होतील अशी माहिती देण्यात आली आहे. तर ग्रुप बुकिंगही केलं जाऊ शकतं. 44 रुपये प्रति किमी दरानं हा प्रवास असेल. म्हणजे मुंबई ते पुणे हा प्रवास 250 रुपयात होऊ शकेल. यामध्ये समजा जर मुंबई ते पुणे असं 200 किलोमीटर असेल तर 44 प्रति किमीने 200 किलोमीटरचे 8800 रुपये इतके होतील. एका बसमध्ये 45 किंवा 55 सीट्स असतील तर प्रत्येक सीटमागे साधारण 250 रुपये होतील. विद्याविहार, मुंबई सेंट्रल, परळ, नेहरू नगर, पनवेल, उरण डेपोमध्ये तुम्ही फोन करून बुकिंग करू शकता. आगार - दुरध्वनी क्रमांक विद्याविहार- 022- 25101182 मुंबई आगार- 022-23072371 परळ आगार- 022-24304620 नेहरु नगर- 022-25522072 पनवेल आगार- 022-27482844 उरण आगार- 022-27222466 संपादन - रेणुका धायबर
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona

पुढील बातम्या