आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार

आज मध्यरात्रीपासून एसटीचा प्रवास महागणार

आज मध्यरात्रीपासून एसटी तिकीट दरवाढ लागू होणार आहे. सर्वप्रकारच्या एसटी तिकीट दरात १८ टक्के इतकी वाढ होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 14 जून : सर्वसामन्यांची 'लालपरी' आता महागणार आहे. आज मध्यरात्रीपासून एसटी तिकीट दरवाढ लागू होणार आहे. सर्वप्रकारच्या एसटी तिकीट दरात १८ टक्के इतकी वाढ होणार आहे.

डिझेलचे वाढते दर तसंच एसटी कामगारांचा वेतनवाढीचा प्रस्ताव यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने सांगितलंय.

VIDEO : पुरोगामी महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारा, हाच तो व्हिडिओ

इंधनाच्या दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी साधारण 460 कोटी रुपये इतका खर्च वाढला आहे. तसंच कामगारांसाठी नुकताच 4,849 कोटी रुपयांच्या वेतनवाढीचा प्रस्ताव करण्यात आला आहे. यामुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडला आहे.

तिकीटदरात 30 टक्के इतकी वाढ करावी, असं महामंडळानं प्रस्तावित केले होते. पण प्रवाशांवर जास्त आर्थिक भार पडू नये यासाठी ही दरवाढ 30 टक्क्यांऐवजी फक्त 18 टक्के इतका करण्याचा निर्णय अंतिमत: घेण्यात आला होता.

...तर भुजबळांसोबत एकत्र येईल-एकनाथ खडसे

First published: June 14, 2018, 10:29 PM IST

ताज्या बातम्या