मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /एसटी बसच्या धडकेत जीपचा चुराडा, 5 जणांचा जागीच मृत्यू

एसटी बसच्या धडकेत जीपचा चुराडा, 5 जणांचा जागीच मृत्यू

मात्र अजुनही रस्ता दुरुस्त झाला नसून आणखी किती बळी घेणार असा सवाल समाजिक संघटनांनी केलाय.

मात्र अजुनही रस्ता दुरुस्त झाला नसून आणखी किती बळी घेणार असा सवाल समाजिक संघटनांनी केलाय.

मात्र अजुनही रस्ता दुरुस्त झाला नसून आणखी किती बळी घेणार असा सवाल समाजिक संघटनांनी केलाय.

सोलापूर 21 फेब्रुवारी : सोलापूरजवळ झालेल्या एका भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. सोलापूर वैराग रोडवरील राळेरास शेळगावच्यामधे हा भीषण अपघात झाला.

या अपघातात 5 प्रवाशांच्या मृत्यू झाला. तर पाच ते सहा लोक गंभीर जखमी आहेत. बस ही सोलापूरकडे निघाली होती. शेळगावच्या दरम्यान बस येतात बस आणि जीपची जोरदार टक्कर झाली. या धडकेत जीपचा चुराडा झाला. जीपमध्ये पंचायत समितीचे कर्मचारी जात होते. त्यातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. तर 5 ते 6 जण गंभीर जखमी असल्याचं माहिती दिली जातेय.

हा रस्ता अतिशय खराब असून त्याच्या दुरुस्तीसाठी कायम आंदोलनं होत असतात. रस्ता दुरुस्तीसाठी तातडीने पाऊलं उचलावीत यासाठी लोकांनी निवेदनही दिलं होतं. मात्र अजुनही रस्ता दुरुस्त झाला नसून आणखी किती बळी घेणार असा सवाल समाजिक संघटनांनी केलाय.

गुन्ह्यांचा शोध लावणाऱ्या तरुण पोलिसानेच केली आत्महत्या, घरात लावला गळफास

दुसरा अपघात

तर नंदुरबारजवळ झालेल्या अन्य एका अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. तोरणमाळ येथील गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीला अपघात. सात पायरी घाटातील नागार्जुन मंदिराजवळ बोलेरो गाडी 30 फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार तर आठ जण जखमी झाले. त्यातल्या  दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

गंमत कराल तर जंमतच करून टाकेल, अजितदादांनी उपटले कार्यकर्त्यांचे कान, VIDEO

जखमींवर म्हसावद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  गंभीर जखमींना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविले आहे.

First published:

Tags: Accident