अमृता फडणवीसांनी टीकेला दिलं शायरीतून उत्तर, म्हणाल्या...

अमृता फडणवीसांनी टीकेला दिलं शायरीतून उत्तर, म्हणाल्या...

अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर आपला एक फोटो शेअर केला असून त्यांनी यामधून आपल्या टीकाकारांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 6 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणातील (SushantSingh Rajput Suicide Case) तपासामुळे आरोप-प्रत्यारोपाची राळ उडाली आहे. यामध्ये भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही उडी घेत सरकारवर आरोप केला होता. या आरोपानंतर अमृता यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आली. या टीकेला आता त्यांनी एका शायरीतून उत्तर दिलं आहे.

'सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, उधर ही ले चलो कश्ती जहां तूफान आया है,' अशा कॅप्शनसह अमृता फडणवीस यांनी ट्विटरवर आपला एक फोटो शेअर केला असून त्यांनी यामधून आपल्या टीकाकारांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत अमृता फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. 'ज्या प्रकारे सुशांतसिंह राजूपत आत्महत्या प्रकरण हाताळण्यात येत आहे, त्यानंतर मुंबईने माणुसकी सोडली असून हे शहर आता निरागस आणि स्वाभिमानी लोकांना राहण्यासाठी सुरक्षित नाही, असं मला वाटतं,' असं ट्वीट अमृता फडणवीस यांनी केलं होतं.

दरम्यान, अमृता फडणवीस यांच्या या टीकेला युवासेनेकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. युवासेनेचे पदाधिकारी वरुण सरदेसाई हे ट्वीट करत म्हणाले की, 'मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता? सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !' अशा कठोर शब्दात सरदेसाई यांनी टीका केली होती.

Published by: Akshay Shitole
First published: August 6, 2020, 7:30 PM IST

ताज्या बातम्या