07 जून : बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडाळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावर आता पडदा पडला आहे. पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष्ग गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळय़ा तारखा पसरवल्या जात आहेत. मात्र सोशल मिडियावर फिरणाऱ्या तारखा अफवा आहेत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या दहावीच्या निकालाच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल्याने गोंधळ दूर झाला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा