दहावीच्या परीक्षेत जास्तीच्या कलागुणांची खैरात आता बंद होणार

दहावीच्या परीक्षेत जास्तीच्या कलागुणांची खैरात आता बंद होणार

राज्य सरकारने दहावीच्या परीक्षेत दिल्या जाणाऱ्या जास्तीच्या कलागुणांमध्ये कपात केलीय. दहाविच्या परीक्षेच याआधी चित्रकलेसाठी २५ गुण देण्यात येत होते. आता नव्या नियमानुसार चित्रकलेसाठी जास्तीत जास्त फक्त १५ गुण देता येणार आहेत. या निर्णयमामुळे कला आणि क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांमुळे मुलांच्या वाढीव टक्केवारीचा फुगा अखेर फुटणार आहे.

  • Share this:

25 नोव्हेंबर, मुंबई : राज्य सरकारने दहावीच्या परीक्षेत दिल्या जाणाऱ्या जास्तीच्या कलागुणांमध्ये कपात केलीय. दहाविच्या परीक्षेच याआधी चित्रकलेसाठी २५ गुण देण्यात येत होते. आता नव्या नियमानुसार चित्रकलेसाठी जास्तीत जास्त फक्त १५ गुण देता येणार आहेत.

दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत कला आणि क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने मिळणाऱ्या अतिरिक्त गुणांमुळे मुलांच्या वाढीव टक्केवारीचा फुगा अखेर फुटणार आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सरसकट गुण देण्याऐवजी, त्यांच्या कौशल्यानुसार टक्केवारीच्या धर्तीवर गुण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसंच लोककलेचाही या गुणांमध्ये आता समावेश करण्यात आला आहे.

शासनाने यासंबंधीचा जीआरही प्रसिद्ध केलाय. तसेच हे गुण मिळवणाऱ्यांसाठी अकरावी प्रवेशात २ टक्के गुण राखीव ठेवण्याचा नियमही रद्द करण्यात आला आहे.

First published: November 25, 2017, 12:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading