SSC Board Exam 2020 : फक्त 25 दिवसांत अशी करा परीक्षेची तयारी

SSC Board Exam 2020 : फक्त 25 दिवसांत अशी करा परीक्षेची तयारी

कोणताही ताण न घेणा आणि भीती न बाळगता नीट चांगली तयारी केली तर आपल्याला नक्की 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवता येतील.

  • Share this:

मुंबई, 04 फेब्रुवारी: दहावीच्या बोर्डाची परीक्षा 3 मार्चपासून सुरू होणार आहे. आजपासून तसं पाहायला गेलं तर मोजून 28 दिवस आपल्या हातात शिल्लक आहे. कोणताही ताण न घेणा आणि भीती न बाळगता नीट चांगली तयारी केली तर आपल्याला नक्की 80 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवता येतील. अजूनही वेळ गेली नाही प्रत्येक तास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. योग्य नियोजन आणि त्यानुसार केलेला अभ्यास आपल्याला भविष्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यामुळे ही वेळ आहे आपण स्वत:ला सिद्ध करून दाखवण्याची. चला तर जाणून घेऊया या 25 दिवसांमध्ये कशी करायची परीक्षेची तयारी

1. वेळापत्रक तयार करा

दिवसात झोपणं आणि आवरणं वगळता तुमच्या हातात किती आणि कसे तास उरतात याचं गणित मांडा. 24 तासातील 10 तास अभ्यासात गेले पाहिजेत. त्यामध्ये वरिएशन कसं तयार करता येईल ते पाहा. एका दिवशी एकच विषय करायचा की दोन तेही आपल्या कन्फर्ट झोननुसार ठरवावं, शक्यतो एक भाषा आणि एक विषय ज्यामध्ये इक्वेशन आहेत असं उदा. मराठी आणि विज्ञान किंवा गणित, हिंदी आणि गणित असं कॉब्मिनेशन तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकता. 10 तास तरी या काही दिवसांमध्ये अभ्यास होणं अत्यंत आवश्यक आहे. सकाळी उठून हा अभ्यास करायचा की रात्री जागून हे आपल्यावर आहे.

2. प्रश्न पत्रिकेचं स्वरुप पाहा. त्यानुसार अभ्यास करा

प्रश्न पत्रिका किंवा कृती पत्रिकेचं स्वरूप कसं आहे ते पाहा. कोणत्या प्रश्नला किती गुण आहेत याचा विचार करून जास्त गुण असलेल्या प्रश्नांची तयारी करण्यावर अधिक भर द्यावा. तसंच ऑबजेक्टीव प्रश्न मार्क मिळवून देणारे असतात त्यामुळे ते चुकणार नाहीत यासाठी चांगली तयारी करावी.

हेही वाचा-चांगले गुण मिळवण्यासाठी पेपर सोडवताना वापरा या सोप्या ट्रिक्स

3.कंपल्सरी सेक्शन प्रश्नासाठी जास्त मेहनत

कंपल्सरी सेक्शनसाठी तुम्हाला मेहनत करावी लागणार आहेच मात्र त्या परोपर पर्याय असणाऱ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला गुण मिळवण्याची संधी अधिक असते. त्यामुळे प्रश्नाचं स्वरुप पाहून कशा पद्धतीचा प्रश्न येईल याचा अभ्यास करावा. बऱ्याचदा एकाच उत्तरावर तीन फिरवून प्रश्न विचारले जातील अशावेळी भांबावून न जाता डोक शांत ठेवून त्याचा सराव केला तर परीक्षा केंद्रावर गोंधळ होणार नाही.

4.विषयाची निवड

आपण सोडवलेल्या प्रश्न पत्रिका आणि पूर्व परीक्षेच्या आधारावर आपल्याला कोणता विषय अधिक कठीण जातोय किंवा अधिक सराव करायला हवा याचा अंदाज घ्या आणि आपल्या टाइमटेबलमध्ये तसा वेळ त्या विषयाला द्या. मागच्या दोन वर्षातील अभ्यासक्रम बदलला नसेल तर पेपर पाहू शकता. त्यामध्ये आपल्याला जे प्रश्न दोन वर्षात पुन्हा विचारण्यात आले आहेत त्याचा अभ्यास करा. यावेळी पुन्हा येण्याची शक्यता असता. यामध्ये मार्च आणि ऑक्टोबर दोन्ही टर्मचे पेपर पाहाणं हिताचं ठरेल.

हेही वाचा-हौसेला मोल नाही! 100% मिळवूनही 'या' एका कारणामुळे पुन्हा परीक्षा देणार जुळे भाऊ

5. समस्या कशी सोडवाल

आपल्याला आलेली समस्या किंवा अडलेली शंका याचं निराकरण कसं कराल तुमच्याकडे 3 पर्याय आहेत. पहिला म्हणजे ऑनलाईन शोधणे. डिजिटल वर्ल्डमुळे ते सध्या सहज शक्य झालं आहे. दुसरं शिक्षक आलेल्या सगळ्या शंका लिहून काढा आणि शिक्षकांना थेट विचार आणि तिसरं म्हणजे आपली मित्र-मैत्रिणी. अभ्यासाचा एका छान ग्रूप तयार करून तुम्ही अभ्यास करू शकता. यामध्ये प्रत्येकानं एक विषय वाटून घ्यायचा आणि समजवून सांगायचा अशा पद्धतीनं अभ्यास चांगला होतो आणि कंटाळाही येत नाही.

6.हेल्दी ब्रेक्स

10 तासांच्या अभ्यासात तुमचे ब्रेक हेल्दी असायला हवेत. यामध्ये कोडी किंवा एकमेकांना फॉर्म्युले सांगण थोडक्यात बुद्धीला चालना देणारे खेळ सध्या खेळा. मनोरंजन किंवा छंद म्हणून ते खेळ खेळल्यानं सध्यातरी आपला वेळ जाईल.

7.सेल्फ मोटिवेशन

सगळ्या गोष्टींमध्ये आपला आत्मविश्वास फार महत्त्वाचा असतो. तो जराही डळमळीत हो न देणं हे आपल्या हातात असतं. स्वत:ला बूस्ट करत राहा. सकारात्मक विचार आणि ऊर्जा आपल्या यशाची वाट अधिक सोपी करते. त्यामुळे नकारात्मक भावना येणार नाहीत यासाठी काळजी घ्या.

हेही वाचा-10 वी पास असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, रेल्वेमध्ये 400 जागांसाठी भरती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 4, 2020 01:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading