रिझर्व्ह बँकेत तैनात असलेल्या जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

रिझर्व्ह बँकेत तैनात असलेल्या जवानाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

ऑन ड्युटी तैनात असताना एका जवानानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • Share this:

नागपूर, 28 जुलै : एका SRPF जवानानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. हा जवान नागपुरात भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या इमारतीत आपलं कर्तव्य बजावत होता.  शनिवारी (27 जुलै) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यानं आपलं आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं. प्रसन्ना मस्के असं आत्महत्या करणाऱ्या जवानाचं नाव आहे. मस्के हे वैशालीनगर येथे वास्तव्यास होते.

राज्य राखीव पोलीस दल ग्रुप क्रमांक चारमध्ये ते कार्यरत होते. शनिवारी रात्रपाळी करत असताना त्यांनी ताब्यात असलेल्या रायफलमधून स्वतःवर गोळी झाडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याबाबतची माहिती मिळताच त्यांनी तातडीनं घटनास्थळ गाठलं आणि त्यांचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवला. पण मस्के यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.

(वाचा : मुंबईकरांनो सावधान! येत्या 24 तासांत विजांच्या कडकडाटासह धुवांधार पावसाची शक्यता)

(पाहा : VIDEO: पावसाचा हाहाकार! कर्जतमध्ये घरं पाण्याखाली, नागरिकांचे हाल)

कर्तव्यावर असताना जळगावच्या जवानाची आत्महत्या

अशीच काहीशी घटना जळगावात मे महिन्यात घडली होती. पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावातील जवानाने कर्तव्यावर असताना स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. पश्चिम बंगाल राज्यातील हाजीपूर वैशाली इथे ही घटना घडली. ईश्वर गिरधर चौधरी (वय- 33) असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव होतं.

ईश्वर चौधरी हे सशस्त्र सीमा बलमध्ये जुलै 2011 मध्ये भरती झाले होते. त्यांची नेमणूक सशस्त्र सीमा बलच्या 65 बटालियनमध्ये बिहार राज्यात होती. मात्र, त्यांनी स्वतःच्या ताब्यात असलेल्या रायफलमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली.

(पाहा : मुसळधार पावसामुळे चिपळूणमध्ये पूरस्थिती, यासोबत इतर महत्त्वाच्या 18 बातम्या)

VIDEO: ऑनलाईन ऑर्डर करताय सावधान! तुमचीही होऊ शकते अशी फसवणूक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 08:27 AM IST

ताज्या बातम्या