उदयनराजेंच्या विरोधात आघाडीने उतरवला उमेदवार, पवारांच्या उपस्थितीत करणार शक्तीप्रदर्शन

उदयनराजेंच्या विरोधात आघाडीने उतरवला उमेदवार, पवारांच्या उपस्थितीत करणार शक्तीप्रदर्शन

दोन दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मोठ शक्तिप्रदर्शन साताऱ्यामध्ये करणार आहे.

  • Share this:

सातारा, 03 ऑक्टोबर : सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज भाजपाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून श्रीनिवास पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा अर्ज दाखल केला जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी उदयनराजे यांनी मोठं शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसही मोठ शक्तिप्रदर्शन साताऱ्यामध्ये करणार आहे.

दुसरीकडे राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हेही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे सातारा आणि कराड या दोन्ही शहरांमध्ये आज काँग्रेस राष्ट्रवादी कडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. तर तिकडे कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय विद्यापीठ समजल्या जाणाऱ्या कागलमध्ये माजी मंत्री हसन मुश्रीफ हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत तर युती मधली पहिली बंडखोरी केलेले समरजित सिंह घाटगे हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

त्यामुळे कागलमध्ये दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन होणार आहे. तसेच चंदगडमधूनही बंडखोरी अटळ असून शिवाजी पाटील हे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांना मुख्यमंत्र्यांनी उमेदवारीचा शब्द दिला होता मात्र शिवसेनेकडून संग्राम कुपेकर यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे पाटील हे बंडखोरी करणार आहेत. कोल्हापूर दक्षिण मतदारसंघासाठी ऋतुराज पाटील हेदेखील आज सायकलवरून जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून अमल महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

इतर बातम्या - पक्षानिष्ठेची एैशी-तैशी, तिकीट नाही मिळालं म्हणून अवघ्या 1 महिन्यात घरवापसी!

सांगली जिल्ह्यात तासगाव मधून स्वर्गीय नेते आर आर पाटील यांच्या पत्नी विद्यमान आमदार सुमनताई पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आज भाजप प्रदेशअध्यक्ष आणि महाराष्ट्रातील भाजपचे क्रमांक 2 चे नेते चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. कोथरूडमधील शिवाजी पुतळ्यापासून वाजतगाजत मिरवणूक निघेल. त्याच सोबत आज कसबा पेठ मतदारसंघातून महापौर मुक्ता टिळक या कसबा गणपतीचे दर्शन घेतील आणि मिरवणुक काढून अर्ज भरतील.

इतर बातम्या - BREAKING: काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, 20 जागांसाठी उमेदवार घोषित

पर्वतीमधून भाजप शहर अध्यक्ष  माधुरी मिसाळ, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे हेही अर्ज भरणार आहे. याशिवाय भाजपचे इतर उमेदवार तसेच काँग्रेस राष्ट्रवादीचे बहुतांश उमेदवार आजच अर्ज भरत असल्याने आणि जवळपास सर्वच उमेदवार वाजतगाजत, मिरवणूक काढून अर्ज भरायला जात असल्याने पुण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होणार आणि पुणेकरांना मनस्ताप होणार यात शंका नाही. याच बरोबर इंदापुरातून नुकतेच भाजपवासी झालेले हर्षवर्धन पाटील आणि मावळमधून बाळा भेगडे हेही अर्ज भरणार आहे.

First Published: Oct 3, 2019 08:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading