Home /News /news /

मोठा हल्ल्याचा कट उधळला, 'लश्कर-ए-तोयबा'च्या कुख्यात दहशतवाद्याला अटक

मोठा हल्ल्याचा कट उधळला, 'लश्कर-ए-तोयबा'च्या कुख्यात दहशतवाद्याला अटक

दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा हल्ल्याचा कट श्रीनगर पोलिसांनी सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने उधळून लावला आहे.

    श्रीनगर,4 जानेवारी: दहशतवादी संघटना लश्कर-ए-तोयबाचा हल्ल्याचा कट श्रीनगर पोलिसांनी सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने उधळून लावला आहे. निसार अहमद डार (वय-23, रा.वहाब पर्रे मोहल्ला) असे कुख्यात दहशतवाद्याचे नाव असून त्याला मोठ्या शस्त्रसाठ्यासह अटक करण्यात आली आहे. श्रीनगर पोलिसांनी शुक्रवारी रात्री ही कारवाई केली. कुल्लन गांदरबलमध्ये झालेल्या चकमकीत निसार अहमद डार हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. या चकमकीत एका पाकिस्तानी दशतवाद्याचा खात्मा करण्यात आला होता. निसार अहमद डार हा मागील काही श्रीनगरमध्ये लपून बसला होता. सुरक्षा यंत्रणेवर हल्ला करण्याची त्याचा कट होता. पोलिसांना याबाबत गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सेक्युरिटी फोर्सच्या मदतीने दहशतवादी निसार अहमद डार याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठाही पोलिसांनी जप्त केला आहे. निसार मागील काही वर्षांपासून दहशतवादी कारवाईमध्ये सक्रिय होता. स्थानिक पोलिसांनी कुख्यात दहशतवाद्याचा शोध घेण्यासाठी तीन दिवसांपासून सर्च ऑपरेशन सुरू केले होते. नौशेरा सब डिव्हिजनमध्ये सीमावर्ती डब्बर क्षेत्रासह इतर भागात पोलिसांनी सर्च ऑपरेशन केले. अखेर तिसऱ्या दिवशी पोलिसांना यश आले. दुसरीकडे, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांना पोलिसाकडून एक आवाहन करण्यात आले आहे. ते म्हणजे, सकाळी 6 वाजता घराबाहेर निघा आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत घरी पोहचा, असे नियोजन करावे, नागरिकांनी लष्कर आणि स्ठानिक पोलिसांना सहकार्य करण्याची विनंती करण्यात आली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Jammu and kashmir

    पुढील बातम्या