फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये श्रीदेवीच्या आठवणीत स्टेजवरच रडले बोनी कपूर

पुरस्कार दिल्यानंतर करण जोहरने श्रीदेवींच्या काही आठवणींना उजाळा दिला. या आठवणी ऐकून तिथे उपस्थित सगळेच भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.

News18 Lokmat | Updated On: Mar 25, 2019 06:21 PM IST

फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये श्रीदेवीच्या आठवणीत स्टेजवरच रडले बोनी कपूर

मुंबई, २५ मार्च- श्रीदेवींचं नाव आजही कुठे घेतलं गेलं की त्यांचं संपूर्ण कुटुंब भूतकाळात रमतं आणि डोळ्यांच्या कडा ओलावतात. फिल्मफेअरच्या मंचावरही काहीसं असंच पाहायला मिळालं. इथे श्रीदेवी यांना लाइफ टाइम अचीव्हमेन्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार घेण्यासाठी बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुली जान्हवी आणि खुशी कपूर उपस्थित होत्या. आईच्या वतीने दोन्ही मुलींनी हा पुरस्कार स्वीकारला.

View this post on Instagram

#janhvikapoor

A post shared by Janhvi Kapoor FC (@janhvi_obsessed) on


पुरस्कार दिल्यानंतर करण जोहरने श्रीदेवींच्या काही आठवणींना उजाळा दिला. या आठवणी ऐकून तिथे उपस्थित सगळेच भावुक झाले आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. याच नाजुक क्षणांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जान्हवी कपूरच्या इन्स्टाग्राम फॅनपेजवरून शेअर करण्यात आले. या भावुक क्षणांशिवाय अजून एक गोष्टीची संपूर्ण अवॉर्ड फंक्शनमध्ये चर्चा झाली ती म्हणजे आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या केमिस्ट्रीची.


जेव्हा रणबीर आणि आलिया स्टेजवर आले आणि अवॉडचे होस्ट विकी कौशल आणि कार्तिक आर्यनने त्यांना इश्क वाला लव्ह गाण्यावर नाचण्यास सांगितलं. मग काय रणबीर आणि आलियाने स्टुडंट ऑफ दी इअरच्या या गाण्यावर रोमँटिक डान्स केला. यावेळी रणबीर कपूरला संजू सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला तर राझी सिनेमासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

Loading...

VIDEO : बारामतीच्या भाजप उमेदवार कांचन कुल यांच्याबद्दल सुप्रिया सुळे म्हणतात...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 25, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...