Elec-widget

Sridevi Death Anniversary: वयाबद्दल विचारलं तर यायचा राग, श्रीदेवी यांच्या या गोष्टी तुम्हाला माहीत नसतील

स्वयंपाकाची जबाबदारी त्या स्वतःवरच घ्यायच्या. जेवणापासून ते घराच्या साफसफाईपर्यंत प्रत्येक गोष्टींची श्रीदेवी स्वतःहून काळजी घ्यायच्या.

  • Share this:

आज श्रीदेवी यांचा पहिला स्मृतिदिन. बॉलिवूडच्या या चांदनीने सर्वांना धक्का देत अखेरचा श्वास घेतला. भलेही आज श्रीदेव आपल्यात नसल्या तरी त्यांची आठवण कायमच आपल्या हृदयात राहतील. आज आम्ही तुम्हाला श्रीदेवी यांच्याबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहोत.

श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की, बोनी जेव्हाही श्रीदेवी यांना त्यांच्या वयाची आठवण करून देतात, तेव्हा त्यांना फार राग यायचा आणि त्या बोनीसोबत भांडायच्याही.

मस्करीत श्रीदेवी म्हणाल्या होत्या की, त्यांचं वय ५० हून जास्त आहे हे जेव्हा लोक सांगतात तेव्हा त्यांना जास्त राग येतो. तसं पाहायला गेलं तर श्रीदेवी यांचा राग योग्यही होता. त्या एवढ्या सुंदर दिसायच्या की त्या नेहमीच तरुण वाटायच्या.

Loading...

श्रीदेवी त्यांच्या लूक आणि मेकअपची सर्वाधिक काळजी घ्यायच्या. त्या आपल्या त्वचेचीही फार काळजी घ्यायच्या. एवढंच काय तर एअरपोर्ट लूकचाही त्या फार विचार करायच्या.

श्रीदेवी यांना कोणत्याही कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तयारी करायला तासन् तास लागायचे. पण तयारी केल्यानंतर जेव्हा त्या कार्यक्रमाला जायच्या तेव्हा तिथे उपस्थित साऱ्यांची नजर फक्त त्यांच्यावरच खिळलेली असायची.

पहिली सुपरस्टार अभिनेत्री अशी त्यांची बॉलिवूडमध्ये ओळख होती. श्रीदेवी यांना साड्यांचं फार वेड होतं. जगभरात कुठेही गेल्या तर तिकडून स्वतःसाठी एक साडी नक्कीच घेऊन यायच्या. अनेक महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये त्या साडी नेसूनच जायच्या.

श्रीदेवी या जेवढ्या यशस्वी अभिनेत्री होत्या तेवढ्याच त्या प्रेमळ आई आणि पत्नीही होत्या. घरातल्या कामगारांवर त्या घर सोडून कधीच जायच्या नाहीत.

श्रीदेवी या जेवढ्या यशस्वी अभिनेत्री होत्या तेवढ्याच त्या प्रेमळ आई आणि पत्नीही होत्या. घरातल्या कामगारांवर त्या घर सोडून कधीच जायच्या नाहीत.

स्वयंपाकाची जबाबदारी त्या स्वतःवरच घ्यायच्या. जेवणापासून ते घराच्या साफसफाईपर्यंत प्रत्येक गोष्टींची श्रीदेवी स्वतःहून काळजी घ्यायच्या.

स्वयंपाकाची जबाबदारी त्या स्वतःवरच घ्यायच्या. जेवणापासून ते घराच्या साफसफाईपर्यंत प्रत्येक गोष्टींची श्रीदेवी स्वतःहून काळजी घ्यायच्या.

जान्हवीने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, श्रीदेवी ती कुठे जाते आणि काय करते याच्या प्रत्येक मिनिटांची माहिती घ्यायची.

‘धडक’ सिनेमाच्या सेटवरही श्रीदेवी नेहमी जायच्या. लहानपणी त्या मुलींचा डबा नेहमी तपासून पाहायच्या आणि दिवसभरात एकदा तरी शांत बसून मुलींनी दिवसभरात काय केलं ते ऐकायच्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 01:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...