प्रिया प्रकाश वॉरियच्या सिनेमात दाखवलं श्रीदेवीच्या मृत्यूचं दृश्य, बोनी कपूरने पाठवली नोटिस

प्रिया प्रकाश वॉरियच्या सिनेमात दाखवलं श्रीदेवीच्या मृत्यूचं दृश्य, बोनी कपूरने पाठवली नोटिस

प्रिया प्रकाशचा ‘श्रीदेवी बंगला’ (Sridevi Bungalow) या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.

  • Share this:

मुंबई, १५ जानेवारी- नवीन वर्ष सुरू होताच पुन्हा एकदा नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध असलेली प्रिया प्रकाश वॉरियर चर्चेत आली आहे. नुकताच तिच्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. या टीझरमध्ये तिने श्रीदेवींची व्यक्तिरेखा साकारली आहे.

प्रिया प्रकाशचा ‘श्रीदेवी बंगला’ (Sridevi Bungalow) या आगामी सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. टीझरमध्ये प्रियाने श्रीदेवी या व्यक्तिरेखेच्या अनेक छटा दाखवल्या आहेत. तर टीझरच्या शेवटी बाथ टबमध्ये झालेल्या मृत्यूबद्दलही दाखवले आहे. या सिनेमात प्रियाने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची व्यक्तिरेखा साकारली आहे.

न्यूज१८ सोबत झालेल्या एका मुलाखतीत प्रियाला ती श्रीदेवी यांच्या जीवनावर आधारित सिनेमा करतेस का असा प्रश्न विचारला असता तिने ‘सिनेमा प्रदर्शित होण्यापर्यंत प्रतीक्षा करा असं उत्तर दिलं होतं. सिनेमाची उत्सुकता टिकून राहावी यासाठी मी सिनेमाबद्दल अधिक बोलणार नाही मात्र यात मी श्रीदेवींची व्यक्तिरेखा साकारत आहे हे मात्र नक्की.’

आता या सिनेमाविरुद्ध बोनी कपूर यांनी निर्मात्यांना कायदेशीर नोटिस पाठवली आहे. असं म्हटलं जातं की, प्रिया प्रकाशचा हा सिनेमा श्रीदेवी यांच्या कुटुंबाची परवानगी न घेताना बनवला.

First published: January 15, 2019, 2:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading