मुंबई, 20 सप्टेंबर : बिग बॉसच्या घरात प्रवेश करताच भारताचा वादग्रस्त क्रिकेटर श्रीशांतचे नखरे सुरू झालेत. दुसऱ्याच दिवशी श्रीशांत आणि सोमी खानमध्ये भांडण झालं होतं. त्या भांडणानंतर श्रीशांतने घराच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. या वादानंतर पण तो शांत बसलेला नाहीये. बिग बॉसच्या घरात मोबाईल वापरायला परवानगी नाहीये. या नियमाला डावलून श्रीशांतने घरात गुपचूप मोबाईल नेल्याचा एक व्हिडिओ बाहेर आलाय.
घरात त्याच्या आणखीन एक कार्यामुळे श्रीशांत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे.
बिग बॉससच्या घरात गेल्यानंतर पुढचे तीन महिने कोणालाही घराबाहेरच्या लोकांशी संपर्क साधता येत नाही. जे लोक नियमितपणे बिग बॉस पाहतात त्यांना हे नक्कीच माहिती असेल. श्रीशांतने घराबाहेर पडण्याच्या प्रयत्नानंतर आता बिग बॉसच्या घरात मोबाईलचा वापर केला असल्याची चर्चा आहे. त्याचा मोबाईल वापरतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडिओमध्ये श्रीशांतने बिग बॉसच्या घरात तिसऱ्या रात्री त्याच्या बेडवर पांघरुणाच्या आड मोबाईल वापरताना दिसत आहे. आता प्रश्न हा येतो की, स्पर्धक जेव्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश करतात तेव्हा त्यांचं सगळं सामान तपासलं जातं. मग घरात मोबाईल आलाच कसा? याविषयी चर्चा आता रंगली आहे.
त्याचबरोबर बिग बॉसच्या घरात १००हून अधिक कॅमेरे आहेत. यामधून देखील त्याने मोबाईल वापरला हे नवल. श्रीशांतच्या या कृत्यावर आता बिग बॉसला काय शिक्षा देणार याकडे बिग बॉसप्रेमींचं लक्ष लागलंय. त्याचबरोबर 'वीकेंड का वार'मध्ये सलमानच्या प्रतिक्रियेची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.