...जेव्हा बारामतीत सुप्रिया सुळेंचा कट्टर विरोधक समोरासमोर येतो!

सुप्रिया सुळे यांनी खड्डे विथ सेल्फी मोहीम राबवून राज्यभरात धुराळा उडवून दिला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना खड्डे बुझवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली होती.

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 05:34 PM IST

...जेव्हा बारामतीत सुप्रिया सुळेंचा कट्टर विरोधक समोरासमोर येतो!

जितेंद्र जाधव, प्रतिनिधी

बारामती, 13 एप्रिल : राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यातला कलगीतुरा महाराष्ट्रात सर्वश्रुत आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांवर सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डा मोहीम राबवून पाटलांवर चांगलाच घणाघात केला होता. आज हे दोन्ही नेते अचानक समोरासमोर आले.

बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे सध्या प्रचारात व्यस्त आहे. त्यांच्याविरोधात भाजपने रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. आज भाजपच्या वतीने कांचन कुल यांच्या प्रचारासाठी महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांची सभा आणि रॅली आयोजित करण्यात आली होती.

तर दुसरीकडे विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची प्रचार रॅली सुरू होती. शहरात दोन्ही पक्षाच्या रॅली सुरू होत्या. अचानक एका वळणावर दोन्ही पक्षाच्या रॅली समोरासमोर आल्यात. यावेळी चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे एकमेकांसमोर आले होते. तेव्हा सुप्रिया सुळे यांनी पाटील यांना नमस्कार केला. तर पाटील यांनीही नमस्कार करून निरोप घेतला.

सुप्रिया सुळे यांनी खड्डे विथ सेल्फी मोहीम राबवून राज्यभरात धुराळा उडवून दिला होता. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना खड्डे बुझवण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागली होती. एवढंच नाहीतर एक जरी खड्डा सापडला तर मंत्रिपद सोडून देईन असा पवित्राही पाटील यांनी घेतला होता.

Loading...

आज बारामतीकरांनी या दोन्ही नेत्यांना एकमेकासमोर उभं ठाकल्याचं पाहुन काय विचार करत असतील असा प्रश्न साहजिकच पडला असेल.

================


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 05:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...