विदर्भातील ५ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा

विदर्भातील ५ शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा

  • Share this:

अकोला, ता. 23 जुलै : अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील ५ कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फवारणीतून विषबाधा झाली आहे. दोन्ही जिल्ह्यातील विषबाधित शेतकऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे समजते. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हाती या वर्षीही बोगस बीटी बियाणे मोठ्या प्रमाणात लागल्याने कापशीवर बोंड अळीचा प्रकोप सुरु झाला आहे.  किड पडू नये यासाठी सद्या सर्वत्र किटक नाशके फवारली जात आहेत. रासायनिक खतांचा वापर टाळावा यासाठी शासनाच्यावतीने सर्व स्तरातून शेतकऱ्यांना आवाहन केले जात असले तरी, रासायनिक खतांचा वापर अद्याप कमी झालेला नाही.

पश्चिम विदर्भात पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, अकोल्यासह अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील बहुतांश पेरण्या आटोपल्या आहेत. बीटी काँटनचे बियाणांची पेरणी केल्यावर दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी त्यावर किटकनाशके फवारत होते. फवारणी करीत असतांना शेतकऱ्यांना विषबाधा झाली. अकोला जिल्ह्यातील विषबाधित शेतकऱ्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात, तर यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दोन्ही जिल्ह्याती विषबाधित  शेतकऱ्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती स्थानिक प्रतिनिधींनी न्यूज8 लोकमतला दिली.

हाच आहे नरेंद्र मोदींचा क्रूर 'न्यू इंडिया', राहुल गांधींचा ट्विटरवरून हल्लाबोल

गेल्या वर्षी बीटी बियाणांवर फवारणी करत असतांना विषबाधा झाल्याने यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात 62 शेतकऱ्यांचा बळी गेला. त्यानंतर किटकनाशक कंपन्यांनी संरक्षक कीटकनाशके बाजारात आणली खरी, पण त्यानंतरही किटकनाशकांची बाधा सुरुच असल्याचे स्पष्ट होत आहे. कपाशीच्या पिकावर बोंड अळीसारखे रोग य़ेऊ नये म्हणून कापूस उत्पादक शेतकरी कपाशीच्या बीटी बियाणांकडे वळले आहेत. पण गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कपाशीत बोंड अळी आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच बीटी बियाणांमधून झालेल्या कापाशीच्या रोपांवर किटकनाशकांची फवारणी करतांना बाधा झाल्याने विदर्भात पाच शेतकऱ्यांना हाँस्पीटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.  राज्य सरकारला घातक किटकनाशकांवर फक्त दोन महिने बंदी घालण्याचे अधिकार आहेत. अशा घातक किटकनाशकांवर कायमची बंदी घालण्यासाठी केंद्रीय किटनाशक बोर्डाला राज्य सरकारने विनंती केली आहे. गेल्या वर्षी साठ टक्के कापूस फस्त केलेल्या बोंडअळीने पुन्हा या वर्षी शिरकाव केल्याने शेतकरी चिंतातुर आहे.

यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन मनिष त्रिनगरीवार यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी किटकनाशक फवारतांना संरक्षक किटचा उपयोग करावा असा सल्ला राज्य सरकारने दिला आहे. तर अकोल्याच्य़ा डाँ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्य़ा कीटकशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. धनराज उंदीरवाडे व पथकाने तेल्हारातील बोंडवळीवर आता शेतकऱ्यांनी फोरमन ट्रॅप लावण्याचा सल्ला दिलाय.

तर, जो पर्यंत रासायनिक किटकनाशकांचा वापर होतोय तो पर्यंत अशा बाधा होतच राहिल. सरकारने अशा किटकनाशकांवर बंदी घालण्यासाठी पयत्न सुरु केले आहे. अशी प्रतिक्रिया वसंतराव नाईक शेतकरी सन्मान मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी न्यूज8 लोकमतला दिली.

पवई तलावाच्या पुनरुज्जीवनाचं काय झालं? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

दीपक मानकरांना दणका, 10 दिवसांमध्ये शरण येण्याचा सुप्रीम कोर्टाचा आदेश

औरंगाबादमध्ये मराठा मोर्चेकरांची 'जलसमाधी'

 

First published: July 23, 2018, 4:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading