आर्चरच्या 6 विकेटवर स्टुअर्ट ब्रॉडचा एक चेंडू भारी, पाहा VIDEO

आर्चरच्या 6 विकेटवर स्टुअर्ट ब्रॉडचा एक चेंडू भारी, पाहा VIDEO

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव वॉर्नर आणि लाबुशेन यांनी केलेल्या भागिदारीने त्यांचा डाव सावरला होता. मात्र वॉर्नर बाद झाल्यानंतर त्यांचा डाव 179 धावांत आटोपला.

  • Share this:

लीड्स, 23 ऑगस्ट : Ashes मालिकेतील तिसऱ्या कसोटीत इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 179 धावांत गुंडाळलं. पहिल्या दिवशी पावसामुळे 52.1 षटकांचाच खेळ झाला. जोफ्रा आर्चरने 6 गडी बाद केले. तरीही स्टुअर्ट ब्रॉडची एक विकेट आर्चरच्या 6 विकेटवर भारी पडली. ऑस्ट्रेलियाच्या 33 व्या षटकांत स्टुअर्ट ब्रॉडने डावखुऱ्या ट्रेविस हेडला त्रिफळाचित केलं.

ब्रॉडने टाकलेला चेंडू ट्रेविस हेडने लेग साइडला फटकावण्याच प्रयत्न केला. मात्र, चेंडू वळला आणि ऑफ स्टम्प उडाली. ब्रॉड़चा हा चेंडू ट्रेविसला समजलाच नाही आणि यष्ट्या उद्ध्वस्त झाल्या. स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीनं कमेंटेटरसुद्धा हैरान झाले. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनने तर ब्रॉडच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चेंडू असल्याचं म्हटलं.

तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्याच दिवशी स्मिथ नसल्याचा फायदा इंग्लंडला झाला. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव फक्त 179 धावांवर संपुष्टात आला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या भेदक माऱ्यासमोर वॉर्नर आणि लाबुशेन वगळता कोणीही टिकू शकलं नाही. दुसऱ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथच्या मानेवर आर्चरचा बाऊन्सर आदळला होता. त्यानंतर स्मिथ दुसऱ्या डावात खेळू शकला नव्हता.

जोफ्रा आर्चरनं सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर भेदक मारा सुरु केला. त्यानं मार्कस हॅरिसला बाद करून पहिला दणका दिला. त्यानंतर उस्मान ख्वाजा, स्टुअर्ट ब्रॉड बाद झेलबाद झाले. वॉर्नर आणि लाबुशेननं पडझड थांबवत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. वॉर्नरने 94 चेंडूत 61 धावांची खेळी केली. यात त्यानं 7 चौकारही मारले.

वॉर्नर बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची घसरगुंडी उडाली. ट्रेविस हेड आणि मॅथ्यू वेड यांना खातंही उघडता आलं नाही. तर कर्णधार टिम पेन फक्त 11 धावा काढून बाद झाला. त्यानंतर पेंटिन्सन आणि कमिन्सला जोफ्रा आर्चरनं बाद केलं. लाबुशेननं 74 धावा केल्या. त्याला बेन स्टोक्सनं बाद केलं. त्यानंतर आर्चरने नाथन लायनला बाद करून ऑस्ट्रेलियाचा डाव संपुष्टात आणला.

'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL

Published by: Suraj Yadav
First published: August 23, 2019, 2:17 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading