डेहराडून ते दिल्ली जैव इंधनावरच भारतातलं पहिलं उड्डाण यशस्वी!

डेहराडून ते दिल्ली जैव इंधनावरच भारतातलं पहिलं उड्डाण यशस्वी!

भारताच्या पहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाचे सोमवारी यशस्वी उड्डाण झालं.

  • Share this:

नवी दिल्ली,ता. 27 ऑगस्ट : भारताच्या पहिल्या जैव इंधनावर चालणाऱ्या विमानाचे सोमवारी यशस्वी उड्डाण झालं. डेहराडून येथून उड्डाण केल्यानंतर हे विमान दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितरित्या उतरले. स्पाईस जेट या भारताच्या विमान सेवा देणाऱ्या कंपनीने हे चाचणी उड्डाण केले. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नितीन गडकरी, सुरेश प्रभू यांनी या विमानाचे दिल्ली विमानतळावर स्वागत केलं. या विमानात ७५ टक्के एव्हिएशन टर्बाइन फ्युएल तर २५ टक्के बायो फ्युएल वापरण्यात आलय. या इंधन प्रकाराची विमान उड्डाण चाचणी यशस्वी झाल्यानंतर याचा देशांतर्गत वापर वाढवण्यावर भर देण्यात येऊ शकतो. १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवे जैव इंधन धोरण जाहीर केले होते. त्यानंतर आज याची यशस्वी अंमलबजावणी केली आहे.

हे जैवइंधन जेट्रोफा पासून तयार करण्यात आलं असून CSIR आणि IIP म्हणजेच इंडियन इन्स्टिट्युट ऑफ पेट्रोलियमने हे जैवइंधन विकसित केलंय. या अशा प्रकारच्या पहिल्या फ्लाईटमध्ये 20 प्रवासी होते यात DGCA आणि स्पाईसजेट च्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. 25 मिनिटांची ही फ्लॅईट भारतातली अशा प्रकारची पहिलीच फ्लॅईट होती.

जैवइंधनाचा वापर केल्यास पारंपरिक इंधानावरचं अवलंबित्व 50 टक्क्यांनी कमी होणार असून त्यामुळं तिकीटाचे दरही कमी होण्याची शक्यता आहे. कारण विमान कंपन्यांचा सर्वात जास्त खर्च हा इंधनावर होत असतो. या इंधनाचा वापर वाढल्यास हवतचं कार्बनचं प्रमाणही खूप कमी होणार आहे.

हवाई वाहतूकीची जागतिक संस्था असलेल्या IATA नुसार ग्रीनहाऊस गॅसच्या उत्सर्जनात हवाई वाहतूकीचा वाटा हा 2 टक्के आहे. 2025 पर्यंत हे प्रमाण कमी करण्याचा निर्णय या संस्थेने घेतला असून त्यामुळं पृथ्विचं वाढलेलं तापमान कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर होत असलेल्या उपक्रमांमध्ये ही संस्थाही सहभागी होणार आहे. हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरल्यास हवाईवातूक क्षेत्राचा चेहेरामोरहा बदलण्याची शक्यता आहे.

VIDEO : पुरात टँकर गेला वाहून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2018 06:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading