Elec-widget

उदयनराजेंना भाजपात सामावून घेण्याचं 'हे' आहे मुख्यमंत्र्यांचं कारण!

उदयनराजेंना भाजपात सामावून घेण्याचं 'हे' आहे मुख्यमंत्र्यांचं कारण!

उदयनराजे भोसलेंनी अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. दिल्लीत अमित शहांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजेंचा हा प्रवेश पार पडला.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : उदयनराजे भोसलेंनी अखेर आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. दिल्लीत अमित शहांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजेंचा हा प्रवेश पार पडला. पण भाजपात प्रवेश करतानाही राजे राष्ट्रवादीवर टीका करायला विसरले नाहीत.

भाजपात प्रवेश करतेवेळी चंद्रकांत पाटलांनी उदयनराजेंचा खास असा परिचयच करून दिला. खरंतर भाजपसाठी हेच खूप काही आहे. कारण, विधानसभेच्या तोंडावर उदयनराजेंसारखा मराठा समाजाचा लोकप्रिय चेहरा आपल्या हाताशी असणं मुख्यमंत्र्यांसाठी अतिशय महत्वाचं होतं. म्हणूनच उदयनराजेंच्या सर्व अटीशर्ती मान्य करूनच त्यांना भाजपात आणलं गेलं. राजेंनीही मग भाजपात डेरेदाखल होताच पहिला निशाना राष्ट्रवादीवरच साधला.

आघाडीपेक्षा युतीच्या काळातच अधिक विकासकामं झाल्याचंही सांगायलाही राजे विसरले नाहीत.

उदयनराजे भाजपात आल्यानंतर मुख्यमंत्री जाम खुश होते. छत्रपतींच्या वंशजांनी भाजपात पक्षात येणं, हे आमच्यासाठी गौरवास्पद असल्याचं ते म्हणाले.

अमित शहांनी तर आम्ही विधानसभा आत्ताच जिंकल्यात जमा असल्याचं जाहीर करून टाकलं.

Loading...

दरम्यान, उदनयराजेंच्या भाजपात जाण्याने राष्ट्रवादीला फारसा फरक पडणार नसल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला.

राजकीय हवेचा अंदाज घेऊन उदयनराजेंची भाजपात घरवापसी झालीय खरी पण त्यांचा बेधडक स्वभाव बघता भाजपची शिस्त ते कितपत अंगवळणी पाडून घेतात, हे पाहणं मोठं रंजक ठरणार आहे. अशातच गेल्यावेळी त्यांचं मताधिक्य बऱ्यापैकी घटलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीही राजेंना पराभूत करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार, पाहुयात नेमकं काय होतंय ते...

===========================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 14, 2019 08:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...