स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेला मंत्री का झाले डोईजड?

स्पेशल रिपोर्ट : शिवसेनेला मंत्री का झाले डोईजड?

एकनाथ शिंदे सोडल्यास विधान परीषदेतील सर्वच मंत्र्यांच्या विरोधात, शिवसैनिकांपासून ते आमदार खासदारांपर्यंत राग व्यक्त केला जातोय.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई

17 आॅगस्ट : शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा बाहेर आलीय आणि यावेळीही टार्गेट मंत्रीच आहेत. त्यामुळे शिवसेनेला आता त्यांचे मंत्री डोईजड झाल्याचंच चित्र आहे. एकनाथ शिंदे सोडल्यास विधान परीषदेतील सर्वच मंत्र्यांच्या विरोधात, शिवसैनिकांपासून ते आमदार खासदारांपर्यंत राग व्यक्त केला जातोय. काय आहेत याच्या मागची कारणं पाहुयात हा रिपोर्ट...

शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांच्या विरोधात, हाजी अराफत शेख यांनी, त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली. ती देखील शिवसेनेचे खासदार आणि दुसरे मंत्री व्यासपीठावर असतानाच.

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या विरोधात व्यक्त होणारी ही खदखद काही पहिल्यांदा नाही. याआधी देखील थेट आमदारांनीच मंत्र्यांविरोधात आवाज उठवला होता. सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, दीपक सावंत यांच्याविरोधात सेना आमदारांच्या तक्रारी आहेत.  शिवसेना पक्षप्रमुखांनी नेते आणि कार्यकर्त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. पण त्यानंतरही धुसफूस सुरूच आहे. या संदर्भात दिवाकर रावतेंनी प्रतीउत्तर देणार नाही असं म्हटलंय.

शिवसेना मंत्र्यांच्या विरोधातील ही वाढती खदखद, आता मंत्र्यांची उचलबांगडी करणार का...? हे पाहावं लागेल.

शिवसेनेला पक्षाअंतर्गत धुसफूस नवीन नाही. पण या असंतोषातून कुणाला संतोष मिळणार...? आणि कुणाचं इप्सित साधलं जाणार हे थोड्याच दिवसात स्पष्टं होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 17, 2017 09:19 PM IST

ताज्या बातम्या