SPECIAL REPORT : सेनेच्या थाळीपेक्षा पुण्यात 'या' ठिकाणी मिळते स्वस्त जेवण, सरकारने रसद तोडूनही मिळते कष्टाची भाकर!

SPECIAL REPORT : सेनेच्या थाळीपेक्षा पुण्यात 'या' ठिकाणी मिळते स्वस्त जेवण, सरकारने रसद तोडूनही मिळते कष्टाची भाकर!

१९९५ला राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेनं एक रुपयात झुणकाभाकर योजना सुरू केली होती. पण, आता काळ बदलला आहे.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 12 ऑक्टोबर : युतीच्या सत्तेत शिवसेनेनं एक रुपयात झुणका भाकर योजना सुरू केली होती. आता जवळपास २४ वर्षांनंतर पुन्हा एकदा सेनेनं दहा रुपयात थाळीचं आश्वासन दिलं आहे. पण अशा लोकप्रिय योजना यशस्वी का होत नाहीत ?

निवडणुका म्हटलं की, लोकप्रिय घोषणांच्या लाटेवर स्वार होवू राजकीय पक्ष सत्तेचं सोपान गाठण्याचा प्रयत्न करतात. शिवसेनेनंही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत हाच मार्ग चोखाळला आहे. लोकांना आवडेल अशी घोषणा त्यांनी केली आहे. कुणाचं ह्रदय जिंकायचं असेल तर तो मार्ग पोटातून जातो हे जाणून अवघ्या दहा रुपयात जेवण थाळी देण्याची लोकप्रिय घोषणा सेनेनं केली. १९९५ला राज्यात युतीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेनं एक रुपयात झुणकाभाकर योजना सुरू केली होती. पण, आता काळ बदलला आहे. झुणका भाकरीपासून सुरू झालेला शिवसेनेचा राजकीय प्रवास आज जेवणाच्या थाळीपर्यंत येवून पोहोचला आहे.

राजकीय पक्षांकडून सत्तेसाठी केल्या जाणाऱ्या लोकप्रिय योजना जास्तकाळ आर्थिकदृष्या व्यवहार्य ठरत नाहीत, हा आजवरचा अनुभव आहे.

१ रुपयात झुणका भाकर ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कल्पना.. युती सरकारनं १९९५मध्ये मोठा गाजावाजा करुन खासगी संस्थांच्या माध्यमातून राज्यभर झुणकाभाकर केंद्र सुरू केली. मात्र, अवघ्या वर्ष-दोन वर्षातचं अनेक केंद्रांना कुलूप लागलं. कारण, या योजनेच्या आर्थिक व्यवहाराचा पाया कच्चा होता. युतीचं सरकार पायउतार होताचं आघाडी सरकारनं ही योजना बासनात गुंडाळली.

खरंतर यापूर्वी तामिळनाडूमध्ये अम्मा कँटीनचा प्रयोग राबवण्यात आला होता.1 रुपयात 1 इडली अथवा 5 रुपयांत भात- सांबर अशी ही योजना होती. पण अत्यल्प दरात अन्न द्यायचं म्हटल्यावर सरकारवर आर्थिक बोजा पडतो. आणि त्या बोजाखाली ती योजना दबून जाते. तामिळनाडूतही तेच घडलं. आज जयललीतांच्या निधनानंतर 99% अम्मा कँटीन बंद आहेत.

एकीकडं सरकारी आहार योजनांची ही अवस्था असताना पुणे शहरातील बाबा आढाव प्रणित हमाल पंचायत गेली ४५ वर्ष अत्यल्प दरात कष्टाची भाकर देत आहे.

युती सरकारनं सुरू केलेल्य़ा झुणकाभाकर केंद्रावर झुणका-भाकरी ऐवजी इतर अन्न पदार्थ आणि वस्तूंची अधिक रेलचेल होती. आता शिवसेनेनं दहा रुपयात जेवणाच्या थाळीचं आश्वासन दिलं आहे. मात्र, हमाल पंचायती प्रमाणे ही योजना यशस्वी होणार का? तिचीही झुणका भाकरी सारखं अवस्था होणार? हा प्रश्न आहे.

========================

Published by: sachin Salve
First published: October 12, 2019, 6:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading