SPECIAL REPORT : भाकरी फिरवून पवारांना विधानसभा काबीज करणे शक्य आहे का?

SPECIAL REPORT : भाकरी फिरवून पवारांना विधानसभा काबीज करणे शक्य आहे का?

ष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला आज २० वर्ष पूर्ण झाले. 2014 पासून राष्ट्रवादीची घसरण सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 10 जून : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला आज २० वर्ष पूर्ण झाले. 2014 पासून राष्ट्रवादीची घसरण सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीची स्थिती खिळखिळी झाली. राष्ट्रवादीला सत्तेचे वेध लागले आहे. पण भ्रष्टाचाराच्या चेहरे बदलत येत्या विधानसभेत सत्ता हस्तगत करण्याचा आव्हान आहे.

"दौड मे शामील हो जीत हो या हार...थांबना मत रूकना मत दौड मे शामील हो..." पक्षाच्या वर्धापन दिनी धनंजय मुंडे यांनी कविता सादर करून मानसिकदृष्ट्या खचलेल्या कार्यकर्त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न केला. गेल्या पाच वर्षांत सत्तेबाहेर राहावं लागल्यानं अनेक दिग्गजांनी राष्ट्रवादीला रामराम करत दुसऱ्या पक्षांचा झेंडा हाती घेतला. आता 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बसललेल्या जबरदस्त धक्क्यातून कार्यकर्त्यांना बाहेर काढून विधानसभेसाठी मनोबल वाढवण्याची तयारी नेत्यांनी चालवली आहे.

राष्ट्रवादीत तरुणांना संधी देण्याचा मनसुबा नेतृत्वानं बोलून दाखवला आहे. एवढ्या पडझडीनंतर भाकरी फिरवून अवघ्या काही महिन्यांत विधानसभा काबीज करणं शक्य आहे का, हासुद्धा एक प्रश्नच आहे.

राष्ट्रवादीची कामगिरी लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही राहिली तर मात्र पक्षाच्या भवितव्यावर मोठं प्रश्नचिन्ह आहे.

====================

First Published: Jun 10, 2019 11:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading