SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या ढाण्या वाघामुळे अजित पवारांसमोर तगडं आव्हान!

SPECIAL REPORT : मुख्यमंत्र्यांच्या ढाण्या वाघामुळे अजित पवारांसमोर तगडं आव्हान!

बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र अजित पवारांसमोर त्यांचा निभाव लागला नव्हता.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 30 सप्टेंबर : धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना बारामतीमधून उमेदवारी देण्याचं सुतोवाच केलं. त्यामुळं आता पवारांच्या गडात भाजपचा ढाण्या वाघ उभा राहणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. पवारांच्या बालेकिल्ल्यावर भाजपनं हल्लाबोल केला असून पडळकर लावणार का बारामतीला सुरूंग ही चर्चा सुरू झाली.

धनगर मतांच्या जोरावर बारामती जिंकण्याचे मनसुबे भाजपनं आखले आहे. तर राजीनामा देऊन बाजूला झालेले अजितदादा कोणाला मदत करणार अजितदादांच्या माघारीनं भाजपचा रस्ता मोकळा होणार का अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय.

गोपीचंद पडळकरांच्या भाजप प्रवेशावेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनी संकेत दिल्यामुळं राजकीय वर्तुळात बारामती विधानसभेची चर्चा सुरू झाली. पवारांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीतून अजित पवारांविरोधात पडळकरांना उमेदवारी देण्याची खेळी भाजपकडून खेळली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गेल्या विधानसभा निवडणुकीत महादेव जानकरांनी बारामतीतून निवडणूक लढवली होती.

बारामती विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मात्र अजित पवारांसमोर त्यांचा निभाव लागला नव्हता. यावेळी पुन्हा आणखी एका धनगर समाजाच्या नेत्याचं आव्हान अजित पवारांसमोर उभं केलं जाण्याची शक्यता आहे. खरंतर नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यामुळे पडळकरांनी भाजपाशी काडीमोड घेत वंचितच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती. पण त्याला उणु-पुरे चार महिन्याचा कालावधीही उलटला तोचं पडळकर भाजपात स्वगृही परतले.

एकीकडे धनगर मतांच्या जोरावर बारामती जिंकण्याचे मनसुबे भाजपनं आखले आहे. तर दुसरीकडं राजीनामा देऊन बाजूला झालेले अजित पवार कोणती भूमिका घेणार? यावरही अद्याप संभ्रम कायम आहे. बारामतीतून पडळकरांना भाजपकडून उमेदवारी दिल्यास त्यांना धनगर समाजाची एकगठ्ठा मतं मिळण्याची खात्री देता येत नाही.

तर सतत पक्ष बदलण्याच्या पडळकरांच्या राजकीय भूमिकेला धनगर समाज कसा प्रतिसाद देतो? यावर बरचं अवलंबून असणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर एक गोष्ट मात्र खऱी आणि ती म्हणजे पडळकरांच्या उमदेवारीमुळं भाजपला अजित पवारांसमोर तगडं आव्हान उभं करता येणार आहे.

=======================

First published: September 30, 2019, 10:08 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading