SPECIAL REPORT : लोकसभेत नंबर 1 कामगिरी करणारा 'वंचित'चा शिलेदार आता भाजपच्या वाटेवर?

सांगलीतले धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला.

News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2019 08:57 PM IST

SPECIAL REPORT : लोकसभेत नंबर 1 कामगिरी करणारा 'वंचित'चा शिलेदार आता भाजपच्या वाटेवर?

आसिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 26 सप्टेंबर : सांगलीतले धनगर समाजाचे युवा नेते गोपीचंद पडळकर यांनी अखेर वंचित बहुजन आघाडीला रामराम ठोकला. धनगर आरक्षणाच्या मुद्यावर भाजप सरकार सकारात्मक असल्याचं सांगून त्यांनी यापुढची राजकीय दिशाही स्पष्ट केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित होऊ शकतो.

अवघ्या काही दिवसांपूर्वीच भाजपवर सडकून टीका करणारे गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा स्वगृही परतण्याच्या मार्गावर आहेत. किंबहुना त्यासाठीच त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या महासचिवपदाचा रितसर राजीनामा देखील दिला.

धनगर आरक्षणासाठी भाजप सरकार सकारात्मक असल्याचं सांगून पडळकरांनी एकप्रकारे यापुढे आपण नेमक्या पक्षात जाणार आहोत. त्यासंबंधीची दिशाच स्पष्ट करून टाकली.

खरंतर गोपीचंद पडळकर यापूर्वी भाजपातच होते. पण लोकसभेवेळी तिकीट न मिळाल्याने ते वंचितमध्ये आले आणि लोकसभा देखील लढवली. त्यात त्यांनी वंचितकडून सर्वाधिक मतं देखील मिळवली होती. पण, आता तेच पडळकर भाजपात निघाल्याने त्याचा त्यांना फटका देखील बसू शकतो, असं जाणकारांना वाटतंय.

Loading...

गोपीचंद पडळकर हे खरंतर धनगर आरक्षणाच्या लढ्यातून पुढे आलेलं राजकीय नेतृत्व...जत, खाणापूर पट्ट्यात त्यांचा चांगला प्रभाव देखील आहे. पण त्यांनी कपडे बदलावेत तसे राजकीय पक्ष देखील बदलले. त्यामुळे या परस्परविरोधी राजकीय भूमिकांचा त्यांचा फायदा होतो की, तोटा हे विधानसभा निकालानंतरच स्पष्ट होईल.

===================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 26, 2019 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...