SPECIAL REPORT : वय अवघे 34 वर्ष, पद देशाचे पंतप्रधान!

SPECIAL REPORT : वय अवघे 34 वर्ष, पद देशाचे पंतप्रधान!

वयाच्या 27व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या सनानं अवघ्या सात वर्षात मोठा राजकीय पल्ला गाठला आहे.

  • Share this:

फिनलँड, 07 डिसेंबर :  फिनलँडची सना मरीन जगातली सर्वात कमी वयाची पंतप्रधान बनली आहे. वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी सनाची सोशल डेमोक्रेट पार्टीनं  पंतप्रधानपदी निवड केली. वयाच्या 27व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवणाऱ्या सनानं अवघ्या सात वर्षात मोठा राजकीय पल्ला गाठला आहे.

फिनलँडमधल्या वेगवान राजकीय घडामोडींमध्ये सना मरीननं एंटी रिने यांचं स्थान मिळवलंय. टपाल विभागाच्या संपानंतर एंटी रिने यांनी पक्षाचा विश्वास गमावला होता. त्यामुळे सोशल डेमोक्रेट पार्टीनं सरकारमधल्या परिवहन मंत्री सना मरीन यांना पंतप्रधानपदासाठी संधी दिली.

देशातलं सर्वोच्च पद मिळवणाऱ्या सनानं, विश्वास संपादन करण्यासाठी प्रचंड काम करावं लागणार असल्याचं सांगितलं. 'मी कधीही  वयाविषयी आणि महिला असल्याविषयी विचार केला नाही. मात्र, काही विचारांनी राजकारणात आल्याचं', सना मरीन यांनी स्पष्ट केलं.

34 वर्षाच्या सना मरीन सध्या जगातल्या सर्वात तरूण पंतप्रधान आहेत. मरीन यांच्यानंतर युक्रेनचे पंतप्रधान ओलेक्सी होन्चारूक यांचा नंबर लागतो. ओलेक्सी 35 वर्षांचे आहेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंगही 35 वर्षांचे आहेत. तर न्युझीलँडच्या पंतप्रधान जैकिंडा आर्डेन ह्या 39 वर्षांच्या आहेत.

सना मरीन यांच्या सरकारला संसद सदस्य लवकरच मंजुरी देण्याची शक्यता आहे. कारण ब्रुसेल्समध्ये युरोपियन युनियनच्या नेत्यांचं संमेलन होतंय. त्यात सना मरीन फिनलँडचं प्रतिनिधित्व करणार आहेत.

Published by: sachin Salve
First published: December 9, 2019, 10:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading