Elec-widget

SPECIAL REPORT : बंडोबांना थंड करून पाटील मैदानात उतरले, मनसे देईल का टक्कर?

SPECIAL REPORT : बंडोबांना थंड करून पाटील मैदानात उतरले, मनसे देईल का टक्कर?

चंद्रकांत पाटलांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज भरला. मात्र, त्यापूर्वी त्यांना बंडोबांना थंड करण्याचं दिव्य पार पाडावं लागलं.

  • Share this:

अद्वैत मेहता, प्रतिनिधी

पुणे, 03 ऑक्टोबर : भाजपनं प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना कोथरुडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्यामुळं हा सध्या सर्वांच लक्ष्य या मतदारसंघाकडं लागलंय. गुरुवारी चंद्रकांत पाटलांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज भरला. मात्र, त्यापूर्वी त्यांना बंडोबांना थंड करण्याचं दिव्य पार पाडावं लागलं.

जोरदार शक्तीप्रदर्शन करीत चंद्रकांत पाटलांनी पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. चंद्रकांत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदारसंघात बंडाचे वारे वाहू लागले होते. जातपात आणि स्थानिक - बाहेरचा असा वाद पेटला होता. त्यामुळचं अर्ज दाखल करण्यापूर्वी स्वपक्षासोबतचं मित्रपक्षातील बंडोबांना थंड करण्याची कसरत चंद्रकांत पाटलांना करावी लागली. थेट जनतेतून निवडूण येण्याचं पवारांनी दिलेलं आव्हान चंद्रकांत पाटलांनी केवळ स्वीकारलचं नाही तर यापुढे पुण्यावर आपलचं वर्चस्व राहणार असल्याचे संकेत त्यानी दिले.

चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीमुळं या मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदललंय. त्यामुळं आता पाटलांच्या तोडीस-तोड उमेदवार शोधण्याची वेळ महाआघाडीवर आली. या मतदारसंघातून मनसेचे किशोर शिंदे रिंगणात उतरले आहेत. ऐनवेळी महाआघाडीचा त्यांना पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या उमेदवारीमुळं कोथरुड हा हायप्रोफाईल मतदारसंघ बनला आहे. त्यामुळं अवघ्या राज्याचं लक्ष्य इथल्या लढतीकडं असणार आहे.

Loading...

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 3, 2019 11:25 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...