SPECIAL REPORT : छगन भुजबळांची विश्वासू कार्यकर्त्याने उडवली झोप, असं काय घडलं?

SPECIAL REPORT : छगन भुजबळांची विश्वासू कार्यकर्त्याने उडवली झोप, असं काय घडलं?

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना येवला या बालेकिल्ल्यातच आव्हान निर्माण झालं आहे. विश्वासू कार्यकर्त्यानंच त्यांच्याविरोधात शड्डू ठोकल्यानं भुजबळ अडचणीत आले आहे

  • Share this:

बब्बू शेख, प्रतिनिधी

मनमाड, 13 जुलै : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांना येवला या बालेकिल्ल्यातच आव्हान निर्माण झालं आहे. विश्वासू कार्यकर्त्यानंच त्यांच्याविरोधात शड्डू ठोकल्यानं भुजबळ अडचणीत आले आहे आणि त्यांनी नव्या मतदारसंघाची चाचपणी सुरू केल्याचं समजतंय.

कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे छगन भुजबळांच्या नाशिक जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण तापू लागल्याचं दिसतं आहे. भुजबळांचा बालेकिल्ला असणाऱ्या येवल्यातून त्यांचे खंदे समर्थक माणिकराव शिंदेंनी दंड थोपटून खळबळ उडवून दिली आहे. भुजबळ यावेळी औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर मतदारसंघाची चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. तिथल्या कार्यकर्त्यांचीही तीच इच्छा आहे. त्यांनी मनमाडमध्ये भुजबळांची भेट घेत घोषणाबाजी केली. त्याला येवल्यातल्या कार्यकर्त्यांनीही घोषणाबाजीनंच प्रत्युत्तर दिलं.

अखेर या जुगलबंदीत भुजबळांनीच मध्यस्थी करत समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

जेलवारी झाल्यानं भुजबळांच्या नाशिकमधल्या राजकीय प्रभावाला धक्का बसला आहे. जामीन मिळाल्यानंतर भुजबळांनी पुन्हा वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला खरा...पण सेना-भाजपनं त्यांची पुरती कोंडी केली. लोकसभा निवडणुकीत पुतणे समीर भुजबळांचा पराभव भुजबळ रोखू शकले नाहीत. घरच्या मैदानातलं हे आव्हान लक्षात घेता छगन भुजबळ दुसऱ्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा विचार करत असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

Loading...

बालेकिल्ल्यातली ही कोंडी फोडण्यात भुजबळ यशस्वी होणार की दुसऱ्या मतदारसंघातून नशीब अजमावणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

===========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 13, 2019 08:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...