S M L

'मंजुळा सारखी तुझीही अवस्था करू'

मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीनं सनसनाटी आरोप केलेत. मंजुळा शेट्येवर थर्ड डिग्री लावल्याचा खुलासा इंद्राणीनं केलाय.

Sachin Salve | Updated On: Jun 28, 2017 09:23 PM IST

'मंजुळा सारखी तुझीही अवस्था करू'

विवेक कुलकर्णी, मुंबई

28 जून : मंजुळा शेट्ये हत्येप्रकरणी इंद्राणी मुखर्जीनं सनसनाटी आरोप केलेत. मंजुळा शेट्येवर थर्ड डिग्री लावल्याचा खुलासा इंद्राणीनं केलाय. एवढंच नाहीतर मंजुळा सारखी तुझी अवस्था करू अशी धमकीही पोलिसांनी दिल्याचा आरोप इंद्राणीनं केला.

भायखळा जेलमध्ये मंजुळा शेट्ट्ये हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासे झालेत. वॉर्डन मंजुळा शेट्ट्येला लावण्यात आलेली थर्ड डिग्रीची कहाणी इंद्राणी मूखर्जीनं कोर्टात सांगितली.इंद्राणी मुखर्जी म्हणते, "मंजुळा शेट्येच्या गळ्यात ओढणीचा फास टाकून तो ओढला जात होता. तिला मारहाण सुरू होती. तिच्या गुप्तांगात काठ्या घालण्यात आल्या. मंजुळाला झालेल्या मारहाणीबाबत आम्ही विचारायला गेल्यावर तिचा मृत्यू झाल्याचं कळालं. मंजुळाच्या मृत्यूच्या बातमीनं महिला कैद्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. कैद्यांचं आंदोलन दडपण्यासाठी जेलमधील लाईट घालवण्यात आली. त्यानंतर सर्व महिला कैद्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. मारहाण करणाऱ्यांत पुरुष पोलिसांचाही समावेश होता. मारहाणीचे व्रण अजूनही हातावर आहेत. तिथल्या जेल अधिकाऱ्यांनी धमक्या दिल्या. "आय विटनेस बनना चाहती है, तो तेरा भी हाल वैसा बना देंगे" असा दम अधिकाऱ्यांनी दिला.

जेलमध्ये मंजुदीदी म्हणून मंजुळा प्रसिद्ध होती. तिला जबर मारहाण करून जेल अधिकाऱ्यांना कैद्यांमध्ये दहशत निर्माण करायची होती. जेलमध्ये कैद्यांवर अमानुष अत्याचार होतात याची नेहमीच दबक्या आवाजात चर्चा असते. या अत्याचारांची कहाणी जगासमोर येण्यासाठी मंजुळाचा बळी जावा लागला हे दुर्दैवं म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 28, 2017 09:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close