SPECIAL REPORT : भाजपचं 'मिशन महाराष्ट्र' व्हाया जम्मू- काश्मीर!

SPECIAL REPORT : भाजपचं 'मिशन महाराष्ट्र' व्हाया जम्मू- काश्मीर!

देशभक्ती आणि राष्ट्रीय मुद्दे हे निवडणूक जिंकण्याचे हुकमी एक्के आहेत हे भाजपला चांगलंच उमगलं आहे.

  • Share this:

प्रशांत बाग, प्रतिनिधी

नाशिक, 14 सप्टेंबर : देशभक्ती आणि राष्ट्रीय मुद्दे हे निवडणूक जिंकण्याचे हुकमी एक्के आहेत हे भाजपला चांगलंच उमगलं आहे. विधानसभा निवडणुकीतही भाजप 370 भोवती प्रचार केंद्रित करण्याचा प्रयत्न करत आहे. भाजपला 'मिशन महाराष्ट्र व्हाया जम्मू काश्मीर' पूर्ण करायचंय हे स्पष्ट दिसतं आहे.

विधानसभा निवडणुकीचं नाशिकमधून रणशिंग फुंकताना भाजपच्या नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचाराचा अजेंडा सेट करण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत जम्मू काश्मीरमधून हटवण्यात आलेल्या कलम 370 चा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आणि त्यातून विरोधकांना टार्गेट करण्याचा भाजपचा मनसुबा स्पष्ट दिसत आहे.

भाजपला राष्ट्रीय मुद्दयाभोवती राज्याची निवडणूक लढवायची आहे. पण विरोधकांनी भाजपचा हा डाव ओळखल्यानं देशाचं नाही राज्याचं बोला, असं म्हणत मुद्द्याला हात घातला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी पुलवामातील दहशवादी हल्ल्यानंतर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा भाजपनं जोरकसणे मांडला. देशभक्तीच्या मुद्याभोवतीच प्रचार फिरत राहिल याचा अटोकाट प्रयत्न केला. त्याला विरोधीपक्षातील नेत्यांनी उत्तर देवून भाजपला हवं तेच केलं. त्यात इतर मुद्यांची चर्चाच झाली नाही. आपल्याला हव्या त्याच मुद्यांभोवती प्रचाराचा अजेंडा सेट करण्यात वाकबगार असलेल्या भाजपच्या तंत्राला विरोधी पक्ष कसं सामोरं जातात हे पाहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 19, 2019 09:11 PM IST

ताज्या बातम्या