SPECIAL REPORT : ...म्हणून विनोद तावडेंना मिळाले नाही विधानसभेचं 'हॉलतिकीट'?

भाजपात खडसेंपाठोपाठ विनोद तावडेंचाही पत्ता कट झाला. विधानसभेच्या उमेदवार यादीतून त्यांना डच्चू मिळाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2019 09:09 PM IST

SPECIAL REPORT : ...म्हणून विनोद तावडेंना मिळाले नाही विधानसभेचं 'हॉलतिकीट'?

विवेक कुलकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 04 ऑक्टोबर : भाजपात खडसेंपाठोपाठ विनोद तावडेंचाही पत्ता कट झाला. विधानसभेच्या उमेदवार यादीतून त्यांना डच्चू मिळाला आहे. त्यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणेंना उमेदवारी मिळाली.

2014 साली मी गृहमंत्री होणार, असा दावा करणाऱ्या विनोद तावडेंना 2019 साली तर साधं विधानसभेचं तिकीट सुद्धा मिळू शकलेलं नाही. अखेर शेवटच्या उमेदवार यादीतही आपलं नाव नसल्याचं लक्षात येतात स्वतः विनोद तावडेंनीच याबाबतचा खुलासा केला. पण संघ शिस्तीप्रमाणे आपण यापुढेही भाजपचेच काम करणार असल्याचं सांगायलाही ते विसरले नाहीत.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आपण अमित शहांकडे तिकीट कापल्याबद्दल विचारणा करणार असल्याचंही तावडेंनी म्हटलंय.

आता आपण तावडेंना डच्चू मिळण्याची नेमकी काय कारणं असू शकतात?

Loading...

- तावडे शिक्षणमंत्री असताना अनेक निर्णय वादात सापडले

- पक्षनेतृत्व तावडेंवर पूर्वीपासूनच नाराज असल्याची चर्चा

- तावडेंना राजकीय महात्वाकांक्षा भोवल्याची चर्चा

- बोरीवली मतदारसंघातही फारसा जनसंपर्क नसल्याचा आरोप

तावडेंना विधान परिषदेवर संधी मिळणार असल्याची चर्चा होती पण स्वतः तावडेंनी असं ही काही ठरलं नसल्याचा खुलासा केला.

खरंतर राज्यात भाजपची सत्ता आली तेव्हा खडसे, तावडेंसारखे नेते स्वतःला मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानत होते. पण आज या दोघांचेही पत्ते निवडणुकीत कट झाले. यावरूनच राज्यात फक्त देवेंद्र फडणवीसांचाच शब्द अंतिम असेल हेच पुन्हा पक्ष नेतृत्वाने अधोरेखित केल्याचं बघायला मिळतं आहे.

==========================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 4, 2019 09:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...