एक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं? कसं पाहा हा SPECIAL REPORT

मात्र, त्याचं नशीब बलवत्तर असल्यानं तो कपारीत अडकला. तिथं फिरायला आलेल्या पर्यटकांनी ही घटना पाहिली.

News18 Lokmat | Updated On: Oct 22, 2019 09:46 PM IST

एक चूक जीव गेला, तरीही 'जिमी'ला वाचवलं? कसं पाहा हा SPECIAL REPORT

मुंबई, 22 ऑक्टोबर : उंच डोंगरातल्या कपारीत अडकल्यानंतर तिथून सुटका करून घेणं अत्यंत अवघड असतं. अशाच एका सुटकेचा थरार सध्या जगभरात गाजत आहे.

हा डोंगर किती उंच आहे याचा अंदाज व्हिडिओ पाहून तुम्हाला लक्षात आला असेल. याच डोंगराच्या कपारीत एक जीव अडकला. कुत्र्यापासून कॅमेऱ्याचा झूम आऊट केलेला अँगल पाहून कोणालाही धडकी भरेल. ऑस्ट्रेलियातल्या बेल्स बीचवर ही घटना घडली. जिमी हा कुत्रा दरीत कोसळला.

मात्र, त्याचं नशीब बलवत्तर असल्यानं तो कपारीत अडकला. तिथं फिरायला आलेल्या पर्यटकांनी ही घटना पाहिली. त्यांनी लगेचच पोलिसांना कळवलं. बचावपथक लगेच घटनास्थळी दाखल झालं. जीव धोक्यात घालून बचावपथकातले जवान कपारीत उतरू लागले.

जिमीपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. छोटी चूकही कपाळमोक्ष करणारी ठरली असती. सर्व खबरदारी घेऊन जवान अखेर सुरक्षितपणे जिमी पर्यंत पोहोचले. संकटात सापडलेल्या जिमीला त्यांनी बाहेर काढलं. जीव वाचल्यानं जिमी बचावपथकातल्या जवानांना बिलगला. जीव कोणताही असो मात्र त्याला वाचवणारा हा नेहमीच मोठा असतो, हेच यातून दिसून येतं.

======================

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: australia
First Published: Oct 22, 2019 09:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...