SPECIAL REPORT : हर्षवर्धन पाटलांची नवी इनिंग, अजित पवारांना पडणार भारी?

हर्षवर्धन पाटलांनी भाजपात प्रवेश केलामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष रंगणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 11, 2019 07:46 PM IST

SPECIAL REPORT : हर्षवर्धन पाटलांची नवी इनिंग, अजित पवारांना पडणार भारी?

सिद्धार्थ गोदाम आणि प्रफुल्ल साळुंखे, प्रतिनिधी

मुंबई, 11 सप्टेंबर : काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील हे भाजपात दाखल झाले आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला. अजित पवारांशी असलेला त्यांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय सामना रंगणार आहे.

काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटीलांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलंय. बुधवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. खरं तर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. भाजपात दाखल होताचं त्यांनी नाव न घेता अजित पवारांवर ही खोचक टीका केली.

गेल्या आठवड्यात हर्षवर्धन पाटलांनी इंदापूरमध्ये समर्थकांचा मेळावा घेवून भाजपात जाण्याचे संकेत दिले होते. अजित पवारांनी आपला विश्वासघात केल्याची जोरदार टीका त्यांनी त्या सभेत केली होती. मात्र खासदार सुप्रिया सुळेंनी हर्षवर्धन पाटलांचे आरोप फेटाळून लावले आहे.

तर 'मी एकदा दिलेला शब्द कधीही पाळतो. मग कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे सांगून पाटील खोटे आरोप करीत आहे', असा पलटवार पवार यांनी केला.

Loading...

हर्षवर्धन पाटलांचं अजित पवारांशी असलेलं राजकीय वैर काही लपून नाही. गेल्या विधानसभा निवणुकीत राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव केला होता.

मात्र, नुकतेच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत केली होती. मात्र इंदापूरच्या जागेचा तिढा कायम होता. आता हर्षवर्धन पाटलांनी भाजपात प्रवेश केलामुळं आगामी विधानसभा निवडणुकीत इंदापूरमध्ये पुन्हा एकदा राजकीय संघर्ष रंगणार आहे.

=======================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 11, 2019 07:46 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...