• Home
 • »
 • News
 • »
 • news
 • »
 • VIDEO आझम खान यांची जीभ पुन्हा घसरली, 'प्रचारबंदी'नंतर पत्रकारांनाच लक्ष्य करत म्हणाले....

VIDEO आझम खान यांची जीभ पुन्हा घसरली, 'प्रचारबंदी'नंतर पत्रकारांनाच लक्ष्य करत म्हणाले....

समाजवादी पक्षाचे नेते आझम खान त्यांच्या वर्तनाने आणखी अडचणीत आले आहेत. जयाप्रदा प्रकरणावर प्रतिक्रिया विचारलायला गेलेल्या पत्रकारांवर भडकलेल्या खान यांनी पुन्हा एकदा वाईट भाषा वापरली.

 • Share this:
  विदिशा (मध्य प्रदेश), 15 एप्रिल : समाजवादी पक्षाचे नेते आझम खान त्यांच्या वर्तनाने आणखी अडचणीत आले आहेत. आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याविरोधात वाईट भाषा वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारबंदी घातली आहे. या विषयी खान यांची प्रतिक्रिया विचारायला पत्रकार सरसावले असताना आझम खान यांनी पुन्हा एकदा वाईट भाषा वापरत पत्रकारांना वाईट वागणूक दिली. आझम खान पत्रकारांशी वाईट शब्दात बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही पत्रकार खान यांना प्रचारबंदीच्या कारवाईविषयी विचारत असताना त्यांनी पत्रकारांची वाईट शब्दांत बोळवण केली. 'आपके वालिद के मौद मे आया हूँ' असं त्यांनी एका पत्रकाराला सुनावलं. Just In: Akhilesh Yadav backs Azam Khan: says Azam Khan was talking about someone else .. We are Samajvadis we never use foul language for women जयाप्रदांविरोधातलं वक्तव्य भोवलं उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार जयाप्रदा आणि सपा नेते आझम खान यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं. रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केलं. आझम खान म्हणाले की,'राजकारण इतक्या खालच्या स्तरावर पोहोचलं आहे का? ज्यांनी 10 वर्ष रामपूरवासीयांचं रक्त शोषलं, ज्यांना बोट पकडून आम्ही रामपूरमध्ये आणलं. त्यांनी आमच्यावर नको-नको ते आरोप केले. त्यांचा खरा चेहरा ओळखण्यासाठी तुम्हाला 17 वर्षं लागली, मी 17 दिवसांमध्येच ओळखलं होतं  की यांची अंडरवेअर खाकी रंगाची आहे. तुम्ही त्यांना मतदान करणार का?. दरम्यान, हे विधान करताना आझम खान यांनी जयाप्रदा यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. ते पुढे असंही म्हणाले की, मी माझ्या हयात नसलेल्या आईची शपथ घेऊन सांगितलं की माझ्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप खोटे आहेत. या विधानावरून चौफेर टीका सुरू झाल्यानंतर आझम खान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, जर मी दोषी आढळलो तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही. अखिलेश यांच्याकडून पाठराखण दरम्यान सपाचे पक्षनेते अखिलेश यादव यांनी मात्र आझम खान यांची पाठराखण केली आहे. "आझम खान दुसऱ्या कुणाबद्दल ते वक्तव्य केलं होतं. महिलांबद्दल बोलताना गैरशब्द वापरण समाजवादी पक्षाच्या विचारांतच नाही", असं अखिलेश म्हणाले. जयाप्रदांनंतर आझम खान यांचं आणखी एक वादग्रस्त वक्तव्य
  First published: